दुभाजक सौंदर्यीकरण ‘रोल मॉडेल’चे तीनतेरा

By Admin | Updated: July 7, 2014 00:04 IST2014-07-07T00:04:34+5:302014-07-07T00:04:34+5:30

शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्याची योजना आखण्यात आली. याचे ‘रोल मॉडेल’ तयार करण्यात आले. हेच रोल मॉडेल नंतर

Three-layer splitter beautification 'roll model' | दुभाजक सौंदर्यीकरण ‘रोल मॉडेल’चे तीनतेरा

दुभाजक सौंदर्यीकरण ‘रोल मॉडेल’चे तीनतेरा

पराग मगर - वर्धा
शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्याची योजना आखण्यात आली. याचे ‘रोल मॉडेल’ तयार करण्यात आले. हेच रोल मॉडेल नंतर शहरातील सामाजिक संस्था आणि व्यावसायिकांच्या सहकार्याने इतर चौकात करण्यात येणार होते. त्यानुसार सोशालिस्ट चौकात दुभाजकावर सौंदर्यीकरण करून झाडे लावण्यात आली; पण नगर परिषदेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने दुभाजक सौंदर्यीकरणाच्या रोल मॉडेलचे तीनतेरा झाल्याचे चित्र दिसत आहे.
शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा हा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर छोटे छोटे चौक असून दोन्ही बाजूला असलेल्या मार्केटमध्ये जाणे सोयिस्कर होते. मुख्य मार्ग असल्याने तो आकर्षक आणि हिरवळीचा असावा अशी शहरवासीयाची स्वाभाविक इच्छा होती. त्यासाठी म्हणून काही वर्षांपूर्वी काही दुभाजकांवर लोखंडी कठडे बसवून झाडे लावण्यात आली. पण यातील झाडांकडे लक्ष न दिल्याने आणि ही झाडे मोठी वाढणारी असल्याने या दुभाजकांवर रान तयार झाले. तसेच कठडेही अपघातांमुळे तुटून बाहेरच्या बाजूला वाकले. त्यामुळे अपघातही वाढले. मोठ्या झाडांच्या सावलीत मोकाट जनावरे बसण्याचा प्रकार सुरू झाला.
या सर्व बाबींना आळा बसावा यासाठी म्हणून नगरपालिकेच्या वतीने दुभाजक सौंदर्यीकारणाचे एक नवे रोल मॉडेल तयार करण्यात आले. याचा डेमो सोशालिस्ट चौकात तयार करण्यात आला. दुभाजकावर त्रिकोणी आकाराचे टाके बसवून त्यात झाडे लावण्यात आली. तसेच त्यावर छोटे बॅनर लावण्याची सोय करण्यात आली. नगर परिषदेच्या योजना तिथे बॅनरच्या साहाय्याने लावण्यात आल्या. पुढे जाऊन असेच सौंदर्यीकरण सामाजिक संस्था आणि इतर व्यावसायिकांच्या मदतीने करण्याचा मानस होता. त्या ठिकाणी आपल्या जाहिराती लावण्याची मुभा देण्यात येणार होती. पण त्याचा अद्याप अत्तापत्ता नसतानाच या सौंदर्यीकरणाचेही तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे.
झाडे लावण्यात आलेल्या टाक्यांमध्ये कचरा साचला आहे. या झाडांना नियमित पाणी दिले जात असल्याचे दिसत असले तरी त्याची नीट स्वच्छता होत नसल्याचे दिसते. परिसरातील कागदाचा कचरा, प्लास्टिक पाणी पाऊच, कागद, खर्रा पन्नी, गुटखा पुड्या अशा प्रकारचा कचरा या कुंड्यांमध्ये आढळून येत आहे. तसेच मोकाट चरत असलेल्या बकऱ्या यातील झाडांना खाऊन टाकतात. त्यामुळे एक चांगली योजना केवळ रोल मॉडेलपुरतीच राहते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. पालिकेने या सौंदर्यीकरणाची सफाई करून नियमित काळजी घ्यावी अशी तसेच नागरिकांनीही कचरा टाकणे बंद करावे अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Three-layer splitter beautification 'roll model'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.