तीन अपघातात तीन ठार, चार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST2020-12-30T05:00:00+5:302020-12-30T05:00:36+5:30

पहिला अपघात सोमवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयाजवळ  झाला. यामध्ये नगरपालिकेचे पाणीपुरवठा कर्मचारी राजू कृष्णाजी सुरकार (४५) हे जागीच ठार झाले. मृत सुरकार हे ढाब्यावर जेवण करुन देवळीकडे पायदळ जात येत होते. यादरम्यान मागाहून येणाऱ्या दुचाकीने त्यांना जबर धडक  दिल्याने त्यांचा मृत्यू झाला तर दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही.

Three killed, four seriously injured in three accidents | तीन अपघातात तीन ठार, चार गंभीर जखमी

तीन अपघातात तीन ठार, चार गंभीर जखमी

ठळक मुद्देमृतामध्ये न.प.च्या कर्मचाऱ्याचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : परिसरात पंधरा तासांच्या अंतराने वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातात तिघांना जीव गमवावा लागला. तर चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. एका पोठोपाठ झालेल्या या अपघातांमुळे परिसरात काळजी व्यक्त होत आहे.
पहिला अपघात सोमवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयाजवळ  झाला. यामध्ये नगरपालिकेचे पाणीपुरवठा कर्मचारी राजू कृष्णाजी सुरकार (४५) हे जागीच ठार झाले. मृत सुरकार हे ढाब्यावर जेवण करुन देवळीकडे पायदळ जात येत होते. यादरम्यान मागाहून येणाऱ्या दुचाकीने त्यांना जबर धडक  दिल्याने त्यांचा मृत्यू झाला तर दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. दुसरा अपघात देवळी ते रत्नापूर मार्गावर राणोजी महाराज यांच्या मठाजवळ सोमवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान झाला. यात यवतमाळकडून देवळीळीच्या दिशेने येणाऱ्या एम.एच. ३१ डिके ००८९ या क्रमांकाच्या भरधाव कारने सामोरील एम.एच. ३२ एके ०१५९ क्रमाकाच्या मालवाहू गाडीला जबर धडक दिली. या अपघातात कार चालक राजू मनोहर लढी (४०) रा. सालोड जागीच ठार झाला. तसेच मालवाहू गाडी चालक सचीन वासुदेव परतपुरे (२५) रा. वाबगाव हा जखमी झाला. तर तिसरा अपघात मंगळवारी दुपारी सव्वा वाजतादरम्यान वाटखेडा चौफुलीवर कार व दुचाकीमध्ये झाला. एम.एच. ४० बी.ई. ३०१४ क्रमांकाची कार अडेगाव मार्गे देवळीकडे येत होती तर याच दरम्यान अंदोरीकडून दुचाकी येत होती. या दोन्ही वाहनांची वाटखेडा चौफुलीवर धडक झाली. यात दुचाकीवरील अशोक विठोबाजी राऊत (४८) रा. वणोजा ता. राळेगाव हे जागीच ठार झाले तर दुचाकी चालक देवराव तायवाडे रा. वणोजा हे जखमी झाले. देवळी पोलिसांनी तिन्ही घटनेची नोंद घेतली असून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Three killed, four seriously injured in three accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात