तीन घटनेत तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: July 14, 2014 02:21 IST2014-07-14T02:21:47+5:302014-07-14T02:21:47+5:30
जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या तीन घटनेत तिघांचा

तीन घटनेत तिघांचा मृत्यू
आकोलीत दोन घटना : कांढळी येथे वीज पडून गुराखी ठार
वर्धा : जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या तीन घटनेत तिघांचा मृत्यू झाला. सिंदी (रेल्वे) नजीकच्या कांढळी येथे वीज पडून गुराख्याचा मृत्यू झाला. तर आकोली येथे दोन घटनेत दोघांचा मृत्यू झाला.
सिंदी(रेल्वे) नजीकच्या कांढळी शिवारात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी रानात गुरं चारण्याकरिता गेलेल्या गुराख्याचा वीज पडून मृत्यू झाला. मृतकाचे नाव वसंत विठ्ठल पचारे(३५) रा. काढळी असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते परिसरातून गुरे घेवून शेताकडे जात होते. यावेळी वीजांचा कडकडाट झाला वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. वृत्तलिहेपर्यंत घटनेचा पंचनामा झाला नव्हता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
शेतमजुराने केले विषप्राशन
आकोलीनजीकच्या मांडवा येथील शेतमजूर राजू जानराव मडावी (३०) याने शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राजू हा मांडवा येथील शेतकरी गजानन उईके यांच्या शेतावर कामाला होता. त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. काही वेळातच तो बेशूद्ध होवून शेतात पडून होता. ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात येताच तातडीने सामान्य रुग्णालय वर्धा येथे उपचारार्थ नेण्यात आले. मात्र वाटेचा त्याचा मृत्यू झाला.
विजेच्या धक्क्याने शेतकरी गतप्राण
आकोली येथे शेतातील कपाशी पिकाला ओलीत करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विद्युत करंट लागून मृत्यू झाला. हनुमानसिंग गणपतसिंग पंधरे (६२) असे मृतकाचे नाव आहे. ही घटना परसोडी शिवारात रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती खरांगणा पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत इंगोले, विनोद राऊत, गजानन दरणे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.