शस्त्राच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न करणाºया तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:44 IST2018-03-01T23:44:19+5:302018-03-01T23:44:19+5:30
बंदुकीसारखी वस्तू दाखवून तथा तलवार व सळाखीने मारहाण करून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून एक फरार आहे.

शस्त्राच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न करणाºया तिघांना अटक
ऑनलाईन लोकमत
आर्वी : बंदुकीसारखी वस्तू दाखवून तथा तलवार व सळाखीने मारहाण करून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून एक फरार आहे. पोलीस कोठडीतील माहितीवरून साहित्यही जप्त करण्यात आले.
नरेश मोहनदास रावलानी (५०) रा. साईनगर आर्वी यांना २५ जानेवारी रोजी दुकानात असताना तीन अज्ञात इसमांनी बिस्कीट पुड्यावरून वाद घालत बंदूक सारख्या वस्तुचा धाक दाखविला. तलवार व सळाखीने मारून जखमी करीत बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला; पण लोक धावल्याने तिघेही आरोपी राजेश महल्ले रा. आर्वी याच्या कारमध्ये पळून गेले. रावलानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. तपासादरम्यान अन्य गुन्ह्यात अटकेतील आरोपी रवी उर्फ माकड्या रतन बोरकर (३०) रा. इंदोरा नागपूर, विशाल रामचंद्र मानेकर (२७) रा. जरीपटका नागपूर व राजेश उर्फ देवगण गजानन महल्ले (४५) रा. आर्वी यांना विचारणा केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला. यावरून आरोपींचा आर्वी न्यायालयातून प्रोडक्शन वॉरंट घेत २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. शिवाय गुन्ह्यात वापरलेली कार क्र. एमएच ४३ एक्स ७६०९ किंमत चार लाख रुपये, लोखंडी सळाख महल्ले याच्याकडून जप्त केले. बंदुक व तलवार आधीच अन्य गुन्ह्यात जप्त केल्याची माहिती दिली. तिघांनाही पोलीस कोठडी देण्यात आली. चौथा आरोपी अंकुश तिरमारे रा. कुऱ्हा ह.मु. नागपूर अद्याप फरार आहे. प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस, एसडीपीओ मैराळे यांच्या मार्गदर्शनात चौधरी, ढोले यांच्या निर्देशानुसार अमित जुवारे, गजानन लामसे, राजेश राठोड, विक्की मस्के, वडनेरकर, मडावी, वाढवे, निघोट, देशमुख यांनी केला.