गावात तणाव : ठाणेदाराच्या हकालपट्टीसाठी गावकरी सरसावलेतळेगाव (श्यामजीपंत) : येथील सहकारी संस्थेचे सदस्य रोशन अजाब खेरडे (३५) हे तक्रार नोंदविण्यास पोलीस ठाण्यात गेले. मात्र ठाणेदाराने त्यांची तक्रार घेण्याचे सोडून मारहाण करीत अश्लील शिवीगाळ केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, येथील प्रतिष्ठीत नागरिक रोशन खेरडे हे सकाळी आपल्या शेतात जात होते. दरम्यान गावातील अरुण नरोडे याच्याशी त्यांचा वाद झाला. अरुण नरोडे याने रोशन खेरडे यांच्यावर कुऱ्हाड भिरकावली. यात रोशन खेरडे यांच्या पायाला इजा झाली. जखमी अवस्थेत रोशन त्याच्या मित्रासह तळेगाव पोलिसात फिर्याद नोंदविण्यास आला. घडलेला प्रकार फिर्यादी रोशन खेरडे याने ठाणेदाराला सांगताच ठाणेदार दिनेश झामरेने तक्रार नोंदविणे तर दूरच जखमी रोशन खेरडे यांना मारहाण करीत अश्लील शिवीगाळ केली. शिवाय खाकीचा दम दिला. काही वेळाने रोशन गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या मदतीने फिर्याद नोंदविण्यात आला. असे प्रकार या ठाण्यात यापूर्वीसुद्धा घडले आहेत. सदर घटनेची माहिती गावात पसरल्याने काही ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर घटनेबद्दल निषेध व्यक्त केला असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावरुन सदर घटनेची तक्रार पोलीस अधीक्षक वर्धा व आमदार दादाराव केचे यांच्याकडे करण्यात आली आहे.(वार्ताहर)
तक्रारकर्त्यांला ठाणेदाराची बेदम मारहाण
By admin | Updated: July 3, 2014 23:42 IST