‘त्या’ नराधमांना अटक करून फाशीची शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:05 IST2018-03-26T22:05:53+5:302018-03-26T22:05:53+5:30

सेलू तालुक्यातील धपकी शिवारात रेल्वे रूळावर २० मार्च रोजी एका मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला. सिंदी (रेल्वे) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. हे प्रकरण राजकीय दबावात दडपण्याचा प्रयत्न होत आहे.

'Those' Naradhams are arrested and sentenced to death | ‘त्या’ नराधमांना अटक करून फाशीची शिक्षा द्या

‘त्या’ नराधमांना अटक करून फाशीची शिक्षा द्या

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना साकडे : आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन

आॅनलाईन लोकमत
वर्धा : सेलू तालुक्यातील धपकी शिवारात रेल्वे रूळावर २० मार्च रोजी एका मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला. सिंदी (रेल्वे) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. हे प्रकरण राजकीय दबावात दडपण्याचा प्रयत्न होत आहे. सखोल चौकशीत आत्महत्या नसून तिच्यावर पाशवी बलात्कार करुन तिची हत्या झाल्याचे समोर आले. यामुळे नराधमांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनने केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
शुभांगीच्या मृत्यूला पोलिसांनी आत्महत्येचे रूप दिले आहे. १९ मार्च रोजी मुलीचे वडील दहेगाव (तुळजापूर) पोलीस ठाण्यात मुलगी घरी न आल्याची तक्रार देण्यास गेले असता कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवून न घेता परत पाठविले. मुलीच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असता तपासाला सुरूवात झाली; पण सध्या खºया गुन्हेगारांना पोलीस विभागाकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पोलीस यंत्रणेकडून सहकार्य मिळत नसल्याने प्रत्यक्ष मुलीच्या वडिलांची भेट घेतली. यातून पोलीस विभागाचे वास्तव रूप संघटनेच्या निदर्शनास आले. जेथे नराधमांनी अत्याचार केला होता, त्या जागेची पाहणी आदिवासी कर्मचाºयांनी केली. मुलीचा मृतदेह आढळला तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. पोलीस विभागाने हस्तगत केलेले कपडे नवीन असून त्यावर एकही रक्ताचा शिंतोडा नाही. यामुळे पोलीस तपास संशयास्पद आहे. ज्या पोलीस अधिकाºयांनी तपासात दिरंगाई केली, त्यांच्यावर कठोर कार्यवाही करून त्यांना त्वरित निलंबित करावे. प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा. यातील आरोपींची कसून चौकशी करून वास्तव उजेडात आणावे. मृत आदिवासी मुलीला न्याय न मिळाल्यास संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष विजय जुगनाके, प्रभाकर उईके, ज्ञानेश्वर मडावी, रमेश मेश्राम, कौरती, सयाम आदी उपस्थित होते.

Web Title: 'Those' Naradhams are arrested and sentenced to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.