आमदारांनी घेतली ‘त्या’ भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:49 IST2017-12-16T23:48:50+5:302017-12-16T23:49:20+5:30
आमदार रवी राणा यांनी नगर परिषद इमारत बांधकाम भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी आर्वी गाठून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांचा सत्कार केला हे उल्लेखनिय.

आमदारांनी घेतली ‘त्या’ भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : आमदार रवी राणा यांनी नगर परिषद इमारत बांधकाम भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी आर्वी गाठून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांचा सत्कार केला हे उल्लेखनिय.
आ. रवी राणा यांनी आर्वी येथे येऊन भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या प्रश्नावर
१९ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळाला घेऊन जाऊ असे आश्वासन दिले. या प्रसंगी सुरेंद्र वाटकर, दिलीप पोटफोडे, अण्णा डोंगरे, अजय इंगळे, वासुदेव सपकाळ, राजू बोरकुटे, बादल गोरडे, कमलेश चिंधेकर, अमोल बेलेकर, विशाल शेंडे, अर्जुन कळंबे, रवींद्र वानखडे, अक्षय काटनकर, सुनील हिंगवे, रेखा वानखेडे, प्रमिला हत्तीमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांसह पदाधिकाºयांनी चौकातच राणा यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांसह सचिवांकडे प्रश्न लावण्याचे आश्वासन
आयोजित विशेष कार्यक्रमात कार्यकर्त्यांना व आंदोलकांना तसेच जखमी राहुल वीरेकर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच झालेल्या भ्रष्टाचाराची विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांचेकडून कालपासूनच माहिती घेत होते. तसेच झालेल्या आंदोलनाची व्हीडीओ क्लीप मागवून घेतली. संबंधीत दस्तऐवज घेवून मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस व प्रधान सचिवांना भेटू, असे आश्वस्त केले.