शहरं
Join us  
Trending Stories
1
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
2
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
3
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
4
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
5
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
6
अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
7
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
8
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
9
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
10
काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
11
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
12
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
13
"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
14
Nashik Municipal Election 2026 : कुंभ पर्वातील वचनात शाश्वत विकासाची ग्वाही; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
15
WPL 2026 Opening Ceremony : हरमनप्रीत अन् स्मृती मैदानात उतरण्याआधी या बॉलिवूडकरांचा दिसणार जलवा
16
'लाडक्या बहिणीं'साठी स्टार प्रचारकही मैदानात, महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक
17
पगारवाढ हवी असेल तर ऑफिसला यावंच लागेल; TCS चा कडक पवित्रा, 'WFO' अटेंडन्स पूर्ण नसल्यास अप्रेझल रखडणार
18
Social Viral: कोण म्हणतं पाणीपुरी विकणं छोटं काम आहे? तापसीने करून दाखवलं 'वर्ल्ड रेकॉर्ड'
19
'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका
20
२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख
Daily Top 2Weekly Top 5

ही विषारी-विखारी कृत्याची शताब्दी ! रा. स्व. संघ विसर्जित करून गांधीजींचे विचार स्वीकारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:20 IST

Vardha : हर्षवर्धन सपकाळ; संविधान सत्याग्रह पदयात्रा वर्ध्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय संविधानावर ज्यांचा विश्वास आहे, ते नियमानुसार वागतात. त्यांचे आचरणही नियमाला अनुसरूनच असते; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा काय, त्यांच्या सदस्यत्वाचे नियम काय, याबद्दल त्यांनी गोपनीयता बाळगली असून, ते मनुस्मृतीवरच चालत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी आरएसएसचे विसर्जन करून गांधी विचार स्वीकारत स्वतःची नोंदणी करून घ्यावी, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रमपर्यंत निघालेली 'संविधान सत्याग्रह पदयात्रा' बुधवारी रात्री वर्ध्यात पोहोचली. यावेळी महात्मा सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, शहीद भगतसिंग यांचे भाचे माजी न्यायमूर्ती जगमोहन सिंग, शैलेश अग्रवाल, काँग्रेस जिल्हा प्रभारी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी राज्यमंत्री रणजित कांबळे, खा. अमर काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, अॅड. चारुलता टोकस, शेखर शेंडे, डॉ. अभ्युदय मेघे, प्रवीण हिवरे यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज ९९ वर्षे ३६४ दिवस पूर्ण झाले असून, शताब्दी साजरी करीत आहे. या कालावधीत त्यांनी जे वाईट कामे केली, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सर्वाचा या सत्याग्रह यात्रेच्या निमित्ताने निषेध करीत असून, ही विषारी-विखारी कृत्याची शताब्दी ठरेल, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

भगतसिंगही राष्ट्रपिता महात्मा गांधींना मानणारेच

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भगतसिंग या दोघांचेही लक्ष्य एकच होते. स्वातंत्र्याकरिता युवकांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वसामान्यांना एकत्र आणण्याची क्षमता गांधीजींमध्ये होती, म्हणूनच आपण बापूंना सॅल्यूट करायला पाहिजे, असे खुद्द भगतसिंगांनी म्हटले आहे. त्यांची फाशी रोखण्यासाठी गांधीजींनी व्हाईसरॉय यांना पत्रही लिहिली होती. त्यामुळे भगतसिंगही बापूंना मानणारेच होते; पण काहींनी याबद्दल अपप्रचार चालविला, असे भगतसिंगांचे भाचे माजी न्यायमूर्ती जगमोहन सिंग म्हणाले.

टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेसRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयnagpurनागपूर