शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात आता थेट प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

वर्ध्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ७९ कोरोना बाधितांची नोंद घेतली असून त्यापैकी ४९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यातील तर ३० व्यक्ती जिल्ह्याबाहेरील आहेत. आर्वी येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कोविड बाधित कर्मचारी वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारतीत येऊन गेल्याने ही इतारतच तीन दिवसांकरिता सील करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभेटीगाठीवर निर्बंध : भूमि अभिलेखचा कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह निघताच उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी प्रशासकीय इमारत सील करण्यात आल्यानंतर आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना थेट जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे विविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या अडचणीत भर पडली असून रुग्ण संख्या वाढताच अधिकाऱ्यांनी स्वत:ला कार्यालयात क्वारंटाईन करून घेतले काय, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.वर्ध्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ७९ कोरोना बाधितांची नोंद घेतली असून त्यापैकी ४९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यातील तर ३० व्यक्ती जिल्ह्याबाहेरील आहेत. आर्वी येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कोविड बाधित कर्मचारी वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारतीत येऊन गेल्याने ही इतारतच तीन दिवसांकरिता सील करण्यात आली आहे. अशीच परिस्थिती जिल्हाधिकारी कार्यालयावर ओढावू नये म्हणून आता वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांना थेट प्रवेश देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी विविध कामानिमित्त आलेल्या अनेक नागरिकांना आल्या पावलीच परत जावे लागले. आम्ही कार्यालयात येत नाहीत; पण आमच्या प्रकरणांचे काय झाले याची माहिती आम्हाला द्यावी, अशी विनंतीच अनेक नागरिकांनी प्रवेश द्वारावर असलेल्या कर्मचाºयांकडे करीत होते.प्रवेशद्वाराजवळ उभारला शामियानाखबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात आता सामान्यांना थेट प्रवेश नाकारला जात आहे. मंगळवारी या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तात्पूर्ता शामियाना उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी नागरिकांच्या विविध तक्रारींचे अर्ज स्विकाले जात आहे. नागरिकांचे अर्ज स्विकारण्यासाठी काही कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या