एपीएलच्या गव्हाचे वाटप केलेच नाही

By Admin | Updated: July 9, 2014 23:41 IST2014-07-09T23:41:07+5:302014-07-09T23:41:07+5:30

सरकारी स्वस्त धान्याचे दुकान माणिकवाडा गावात गत अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तीकडे आहे. यामुळे सदर दुकानदार मनमानी करीत शासनाकडून मालाची उचल करून कार्डधारकांना देत नाही.

There is no allocation of APL wheat | एपीएलच्या गव्हाचे वाटप केलेच नाही

एपीएलच्या गव्हाचे वाटप केलेच नाही

आष्टी (श़) : सरकारी स्वस्त धान्याचे दुकान माणिकवाडा गावात गत अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तीकडे आहे. यामुळे सदर दुकानदार मनमानी करीत शासनाकडून मालाची उचल करून कार्डधारकांना देत नाही. खुल्या बाजारात विकून हजारो रुपयांचा मलिता लाटत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आणला़ याप्रकरणी तहसीलदाराकडे लेखी तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे.
जून २०१४ या महिन्यातील एपीएलचा धान्य पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय आष्टीकडून उचल करण्यात आला़ धान्य आले की नाही, याबाबत गावातील मारोती शिंगणे, हिरामण खवशी, निळकंठ मानमोडे, केशव फरकाडे, सुदर्शन राऊत यांनी विचारणा केली असता धान्य आलेच नसल्याचे सांगण्यात आले़ यानंतर एपीएलचे धान्य गहू, तांदूळ चोरीच्या मार्गाने खुल्या बाजारात विकल्याची माहिती मिळाली.
याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयात लेखी तक्रार केली. गावकरी नायब तहसीलदार मृदूलता मोरे यांना भेटले असता त्यांनी गोदाम रक्षकाला बोलवून धान्य वितरित केले काय, अशी विचारणा केली़ यावर त्यांनी उचल केल्याचे सांगितले. यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली. प्रकरणाची त्वरित चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा हिरामण खवशी व ग्रामस्थांनी दिला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: There is no allocation of APL wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.