बालपणापासून शिस्त आत्मसात करण्याची गरज
By Admin | Updated: May 13, 2014 00:05 IST2014-05-13T00:05:12+5:302014-05-13T00:05:12+5:30
बालवयात शिस्त आत्मसात केल्यास कुठलेही काम निकराने करण्याची सवय लागते. ही सवय मोठेपणी जास्त कामी येते.

बालपणापासून शिस्त आत्मसात करण्याची गरज
सेवाग्राम : बालवयात शिस्त आत्मसात केल्यास कुठलेही काम निकराने करण्याची सवय लागते. ही सवय मोठेपणी जास्त कामी येते. शिबिरात सर्व कामे ही समुहाने करावयाची असतात. देशही एक समुहच असतो पण कामासाठी शिस्त मात्र आवश्यक असते. त्यामुळे शिस्तीचे धडे गिरविण्याची गरज नई तालिम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी व्यक्त केली. नई तालिम समिती परिसरात रविवारपासून लहान मुलांच्या शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रसेवादल ध्वजारोहणाने शिबिराला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ज्योती कोरडे साने गुरुजी यांच्या पुस्तकांविषयी मुलांना माहिती देताना म्हणाल्या, ते मातृभक्त व देशभक्त होते, शामची आई या पुस्तकातून साने गुरुजींचे दर्शन घडते. स्वत:ला घडविण्यासाठी साने गुरुजींच्या गोष्टी, मुलांनी वाचणे आवश्यक असल्याचेर सांगून त्यांच्या विविध कथा कोरडे यांनी मुलांसमोर प्रस्तुत केल्या. दया बहन यांनी विनोबांवर कथाकथन करुन त्यांच्या कथा बालकांसमोर सांगितल्या. गजानन सुरकार हे अंधश्रद्धेवर महिती देताना म्हणाले, समाजात भोंदूबाबांचे मोठे पेव फुटले आहे. आयुष्याचा नाश करणार्या घटना घडत असून याचा वोरोध करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच सामान्य माणसाचा फायदा घेऊन ते कसे लुबाडतात याचे प्रात्यक्षितही सुरकार यांनी करून दाखवित यापासून दूर राहात वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी बालगण्याचे आवाहन केले. योग, व्यायाम, संगीत, गाणी, चित्रकला, कागदकाम, चांगल्या फिल्म्स, हसत खेळत प्राथमिक गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी, पोस्ट बँक, सामान्य व्यवहार कळणे, मैदान शाखा तंत्र, मैदानी खेळ, सुंदर व्याख्यान, मुल्यांकन आणि प्रार्थना असा दैनिक कार्यक्रम या शिबिरात आयोजित आहे. कार्यक्रमाचे संचालन अविनाश सोमनाथे यांनी केले. नितीन, गजानन अंबुलकर, संजय आत्राम, मनोज, शरद आणि डिंपल शिबिरात विद्याथ्यार्ंना मार्गदर्शन करीत आहे. ३७ मुले-मुली यात सहभागी झाली आहेत.(वार्ताहर)