शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'एनर्जी ड्रिंक' मुळे मुलांना वाढलाय हृदयविकाराचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 17:11 IST

ताकदीसाठी फळे खावीत : आरोग्यावर होतात विपरीत परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मुलांमध्ये एनर्जी ड्रिंक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या ड्रिंकमध्ये केमिकलचे प्रमाण बरेच असल्याने मुलांना हृदयविकाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे एनर्जी ड्रिंकचे सेवन करताना काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

एनर्जी ड्रिंक्सच्या सुरक्षेबाबत नियमनाचा अभाव आहे. तसेच तरुणांना आकर्षित करण्यासाठी या पेयांचे मार्केटिंग केले जाते. एनर्जी ड्रिंक्समध्ये असलेल्या घटकांपैकी कॅफेन हा सर्वात सामान्य घटक असल्याने त्याचे दुष्परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. ड्रिंक्समध्ये असलेले कॅफेन हे एकाग्रता आणि सतर्कता वाढविण्यासाठी आहे. परंतु या कॅफेनमुळे अस्वस्थता, हृदयाचा ठोका वाढणे आणि निद्रानाश यासारखी काही लक्षणे उद्भवू शकतात.

कॅफेनच्या हाय डोसमुळे हायपरटेन्शन, पल्पिटेन्शन, कॅल्शियमची कमतरता निर्माण होणे यासह अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. एनर्जी ड्रिंक्सचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे मानसिक आरोग्य खराब होणे, हृदय व रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम होणे आदी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

युवकांमध्ये एनर्जी ड्रिंक्सची क्रेझशहरी भागातील मुले व युवकांमध्ये एनर्जी ड्रिंकची क्रेझ अलीकडे वाढली आहे. अनेकजण मेडिकल स्टोअर्समधून ते नेत असतात.

दूरगामी दुष्परिणामया पेयांमध्ये असलेली साखर दातांचे एनॅमल खराब करू शकते. ज्यामुळे कॅव्हिटी आणि दात अतिसंवेदनशील होणे, यासारख्या समस्या उद्भवू शकतात. बऱ्याच काळासाठी एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्यास शरीरावर परिणाम होऊ शकतो.

प्रमाणाबाहेर साखर व कॅफेनएनर्जी ड्रिंकमध्ये प्रमाणापेक्षा साखर व कॅफेन समाविष्ट आहे. याचे सेवन करणाऱ्यांच्या शरीरावर मोठे परिणाम होतात. शाळकरी मुले व लहान बालकांनी एनर्जी ड्रिंकचा नाद सोडून द्यावा. त्याऐवजी फळे व पौष्टिक आहार घ्यावा, जेणेकरून मुलांची शक्ती वाढविण्यास मदत होईल.

एनर्जी ड्रिंक अत्यंत घातक

लिव्हर आणि किडनीलाही धोका :आपले शरीर फक्त साखरेवर चालते. आपण जे काही खाते ते ग्लुकोज (साखर) मध्ये रूपांतरीत करूनच शरीर वापरण्यास सक्षम असते. पण, जास्त साखर खाल्ल्यास ती यकृतातही जाते. या अतिरिक्त्त साखरेचे यकृतातील फॅटमध्ये रूपांतर होते. जेव्हा जास्त चरबी यकृतामध्ये जमा होण्यास सुरुवात होते तेव्हा ते रक्तप्रवाहात पाठवू लागते.

हृदयासंबंधी आजाराचा धोका :एनर्जी ड्रिकमध्ये विविध प्रकारचे रसायन राहत असल्याने हृदयासंबंधी आजार बळावण्याची शक्यता अधिक असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लठ्ठपणा वाढतो :एनर्जी ड्रिक वारंवार तसेच अधिक काळपर्यंत सेवन केल्यास लठ्ठपणा वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यातून इतरही आजार होतात.

मानसिक समस्या :एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे सेवनामु‌ळे मानसिक आजारावरही परिणाम होतो, असे मानसिक रोगतज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

"स्पोर्ट ड्रिंक्समध्ये सहसा जास्त साखर आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे झटपट ऊर्जा देतात, परंतु त्या बदल्यात त्यापेक्षा जास्त नुकसान करतात. एनर्जी ड्रिक्सचा तुमच्या झोपेवरही परिणाम होतो. कमी झोप घेतल्याने थकवा, अशक्तपणा आणि आळस वाढू शकतो. एनर्जी ड्रिक्सऐवजी नैसर्गिक पद्धतीने शरीराला ऊर्जावान ठेवण्याचा प्रयत्न करणे केव्हाही चांगले. यासाठी फायबर, मॅग्नेशियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा आहारात समावेश असावा.त्याचा किडनीवर परिणाम होतो."- डॉ. सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ, वर्धा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सwardha-acवर्धा