वर्धेकडे जाणाऱ्या मालवाहूने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST2022-02-12T05:00:00+5:302022-02-12T05:00:32+5:30
धावत्या वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने वाहनाबाहेर पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला. या घटनेमुळे वर्धा-नागपूर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. वर्धा येथे कुटुंबातीलच लग्नसोहळा असल्याने अंधण आणण्यासाठी एम. एच १५ डी. के. ५७४० क्रमांकाचा मालवाहू सिंदी (रेल्वे) येथून वर्ध्याच्या दिशेने जात होता.

वर्धेकडे जाणाऱ्या मालवाहूने घेतला पेट
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : ऐन पेट्रोलपंपाजवळ भरधाव मालवाहूने अचानक पेट घेतल्याने एकच तारांबळ उडाली होती. ही घटना वर्धा-नागपूर मार्गावर सेलूनजीकच्या एचपीसीएलच्या पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सायंकाळी घडली.
धावत्या वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने वाहनाबाहेर पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला. या घटनेमुळे वर्धा-नागपूर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. वर्धा येथे कुटुंबातीलच लग्नसोहळा असल्याने अंधण आणण्यासाठी एम. एच १५ डी. के. ५७४० क्रमांकाचा मालवाहू सिंदी (रेल्वे) येथून वर्ध्याच्या दिशेने जात होता. चालक मंगेश बेलखोडे याने सिंदी येथे वाहनात डिझेल भरले. भरधाव वाहन नागपूर-वर्धा मार्गावरील सेलू नजीकच्या एचपीसीएलच्या पेट्रोल पंपाजवळ आले असता वाहनाचा ब्रेकच लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले.
अशातच वाहनाच्या दर्शनीय भागातून धूर निघत असल्याचे निदर्शनास असल्याने चालक थोडा घाबरला. याही परिस्थितीत चालकाने स्वत:ला कसेबसे सावरत वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून वाहनाबाहेर पळ काढला. बघता बघता आगीने वाहनाला आपल्या कवेत घेतल्याचे लक्षात येताच पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.