अफगाणिस्तानात तणाव वाढला; बाजारात ड्रायफ्रुट्स महागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST2021-08-20T05:00:00+5:302021-08-20T05:00:26+5:30

देशात अफगाणिस्तानसह  इतर ठिकाणांहून सुकामेव्याची आवक होते. अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील घडामोडींमुळे अरब देशातून होणारी  सुकामेव्याची आवक थांबली आहे. त्यामुळे बदामाचे दर प्रचंड वधारले आहेत. प्रतिकिलो १२०० ते १४०० रुपयांवर पोहोचले आहेत. किलोमागे ४०० ते ६०० रुपयांची दरवाढ झाली आहे. काजूचे दर किलोमागे १०० रुपयांनी वाढले आहेत. अंजीर, खजूर, पेंडखजूर, काळा मनुका, पिस्ता यांच्या किमतीचीही १० टक्क्यांनी वाढल्या.

Tensions rise in Afghanistan; Dry fruits are expensive in the market! | अफगाणिस्तानात तणाव वाढला; बाजारात ड्रायफ्रुट्स महागले!

अफगाणिस्तानात तणाव वाढला; बाजारात ड्रायफ्रुट्स महागले!

सुहास घनोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील घडामोडींचा थेट परिणाम शहरातील सुकामेव्याच्या बाजारावर  झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेसह अफगाणिस्तानातून होणारी सुकामेव्याची आवक थांबल्याने बदामाच्या किमतीत मोठी तेजी आली आहे. बदामाचे दर प्रतिकिलो  ८०० रुपयांवरुन  १२०० ते १४०० रुपयांवर पोहोचले आहेत. काजू, अंजीर, जर्दाळू पिस्त्याचेही भाव वाढले असून आणखी वाढण्याची शक्यता सुकामेवा विक्रेत्यांनी व्यक्त केली.
अफगाणिस्तानातील घडामोडींपूर्वी शहरातील बाजारपेठेत बदामाचे भाव प्रतिकलो ८०० रुपये होेते. तर अंजीर ६०० ते ७००, पिस्ता ६५० ते ७००, जर्दाळू ५०० ते ५५० काजू ८०० ते ८५० रुपये प्रतिकिलो होते. मागील काही महिन्यांपासून हे दर स्थिर होते. देशात अफगाणिस्तानसह  इतर ठिकाणांहून सुकामेव्याची आवक होते. अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील घडामोडींमुळे अरब देशातून होणारी  सुकामेव्याची आवक थांबली आहे. त्यामुळे बदामाचे दर प्रचंड वधारले आहेत. प्रतिकिलो १२०० ते १४०० रुपयांवर पोहोचले आहेत. किलोमागे ४०० ते ६०० रुपयांची दरवाढ झाली आहे. काजूचे दर किलोमागे १०० रुपयांनी वाढले आहेत. अंजीर, खजूर, पेंडखजूर, काळा मनुका, पिस्ता यांच्या किमतीचीही १० टक्क्यांनी वाढल्या.

१५ दिवसांचाच स्टॉक शिल्लक 
- अफगाणिस्तानातील घडामोडींचे पडसाद वर्ध्याच्या बाजारपेठेतही उमटले असून आवक थांबली आहे.
- बाजारपेठेतील किराणा व्यावसायिक सुकामेवा विक्रेत्यांकडे १५ दिवस पुरेल इतका साठा आहे. 
- आणखी दोन महिन्यापर्यंत सुकामेव्याचे दर वाढलेलेच असतील, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली. 
 

दर पूर्ववत होणे कठीण

देशात अमेरिकेसह अफगाणिस्तान आणि इतर भागातून सुकामेव्याची आवक होते. अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील घडामोडींचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून सुकामेव्याची आवक थांबली आहे. त्यामुळे काजू बदामसह सर्वच सुकामेव्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आणखी दोन महिने भाव वाढलेलेच राहण्याची शक्यता आहे.
-इद्रिस मेमन,सचिव, व्यापारी असोसिएशन, वर्धा.

मध्यंतरी काही महिने सुकामेव्याचे दर स्थिर होते. अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे सुकामेव्याची आवक थांबली असल्याने काजू, बदाम व इतर सुकामेव्याचे दर प्रचंड वधारले आहेत.  अशीच परिस्थिती राहिल्यास सुकामेव्याचे दर पूर्ववत होणे कठीण असून सणासुदीच्या दिवसात नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.
-प्रवीण बोरले, 
 व्यावसायिक, वर्धा.
 

 

Web Title: Tensions rise in Afghanistan; Dry fruits are expensive in the market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.