शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईचा धडाका दहा वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

वाळू व गौणखनिज चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी बगळे यांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी मदनी (दिंदोडा) परिसरातून मुरुमांची अवैध वाहतूक करणारे चार ट्रक जप्त केले आहे.

ठळक मुद्देगौण खनिजाची अवैध वाहतूक : तहसीलदारांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/सेलू : वर्धा, सेलू व देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन होत असल्याने महसूल विभागाने कारवाईचा धडाका सुरु केला आहे. देवळी तालुक्यात वाळू घाटावर कारवाई करीत वाहनांसह बोट जप्त करण्यात आली. तर सेलू व वर्धा तलसीलदारांनी गौणखनिजांची वाहतूक करणारे दहा ट्रक जप्त केले आहे. त्यामुळे वाळू व गौणखनिज चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी बगळे यांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी मदनी (दिंदोडा) परिसरातून मुरुमांची अवैध वाहतूक करणारे चार ट्रक जप्त केले आहे. चारही ट्रक डी. पी. जैन कंपनीचे असून त्यांचे क्रमांक एम. एच. ४०-डी. जे. ११२९, एम. एच. ४० - बी. जी. ११२७, एम. एच. ४० -ऐ. के. ६६३६ व एम. एच.३१ सि.क्यू. ७०११ असे आहे. या ट्रकमध्ये २० ब्रास मुरुम आढळून आल्याने ४ लाख ३० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. यासोबतच सेलुचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनीही कोपरा-हमदापूर शिवारातून मुरुमाची अवैध वाहतूक करणारे सहा ट्रक जप्त केले आहे. या ट्रकचे क्रमांक जे.एच.१४-डि.डि.०४१०, एम.एच.१२-ई.एफ. ४२१२, एम.एच.१२-आर.एन.१६९८, टि.एन.६६-ई-८०२३, सी.जी.१९-एच.०९४१ प ओ.डी. ३०-१९२१ असे आहेत. ही सहाही ट्रक पाटील कंस्ट्रक्शनच्या मालकीचे असल्याचे तहसीलदार सोनोने यांनी सांगितले आहे. या कारवाईतील ट्रकवर कितीचा दंड आकारण्यात आला, याची माहिती देण्यास नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.अखेर गुंजखेडा घाटातून बोटी जप्तदेवळीचे तहसीलदार गुंजखेडा घाटात कारवाई करुन एक ट्रॅक्टर व दहा ब्रास वाळूसाठा जप्त केला होता. परंतू घाटातील बोट अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत पळून गेली होती. त्यामुळे ट्रक्टर पुलगाव पोलीस ठाण्यात उभा करुन बोट ताब्यात द्या अन्यथा गुन्हा दाखल करणार, असा इशारा दिला होता. शेवटी सोमवारी तहसीलदार राजेंद्र सरवदे, नायब तहसीलदार राठोड व मंडळ अधिकारी दुबे यांनी गुंजखेडा घाटातील सर्वे क्रमांक ४ मधून बोट जप्त केली. पुलगावच्या नायब तहसीलदार कार्यालयात बोट उभी करण्यात आली आहे. या बोटीचा मालक अद्यापही स्पष्ट झाला नाही. त्यामुळे याबाबत अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असून जर मालकीहक्क कोणी सांगितला नाही तर या बोटीचा लिलाव करणार असल्याचे तहसीलदार राजेंद्र सरवदे यांनी सांगितले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस