सात कर्मचाऱ्यांकडे दहा गावांचा कारभार

By Admin | Updated: May 14, 2014 02:13 IST2014-05-13T00:05:40+5:302014-05-14T02:13:59+5:30

स्थानिक वीज वितरण कार्यालयाअंतर्गत परीसरातील दहा गावांचा समावेश आहे. मात्र दहा गावांकरिता केवळ सात विजतंत्री असल्याने वीज ग्राहकांना बरेचदा

Ten employees in ten employees | सात कर्मचाऱ्यांकडे दहा गावांचा कारभार

सात कर्मचाऱ्यांकडे दहा गावांचा कारभार

घोराड : स्थानिक वीज वितरण कार्यालयाअंतर्गत परीसरातील दहा गावांचा समावेश आहे. मात्र दहा गावांकरिता केवळ सात विजतंत्री असल्याने वीज ग्राहकांना बरेचदा अडचणीचा सामना करावा लागत आहे. कर्मचार्‍यांअभावी बरीच कामे खोळंबतात. यामुळे विणाकारण शेतकरी तसेच नागरिक वेठीस धरले जातात. याकरिता रिक्त पदांवर कर्मचारी नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

विजतंत्री हे पद महत्त्वाचे असून विद्युतसंबंधी कोणताही बिघाड आल्यास याच कर्मचार्‍यांकडे दुरुस्तीची जबाबदारी असते. यामुळे पदरिक्ततेचा सर्वाधिक परिणाम नागरिकांना सोसावा लागतो. सहा हजार लोकसंख्या असलेल्या घोराड येथे १ हजार २६७ घरगुती वीज जोडणी आहे. या गावाला सात रोहित्रावरुन वीज पुरवठा केला जातो. तसेच जखाळा, रिंगणी, घोराड, बिबी, डोरली आदी मौजात ४00 कृषिपंप आहेत. या गावांकरिता केवळ दोन लाईनमन आहे. या दोघांवरच कामाची धुरा असल्याने तांत्रिक बिघाड आल्यास दुरुस्तीला विलंब होतो. या गावात नळयोजनेकरिता विजेची आवश्यकता असल्याने तक्रारीचा निपटारा जलद होणे गरजेचे आहे. याकरिता अधिक कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे. घोराड वीज कार्यालयाअंतर्गत येणार्‍या किन्ही, मोही, ब्राम्हणी येथे ३00 घरगुती तर ३00 कृषिपंप आहे. येथे एक कर्मचारी, सुकळी (स्टे.) येथे २५0 घरगुती तर १५0 कृषिपंपकरिता एक कर्मचारी, महाबळा येथे ३५0 घरगुती, २२५ कृषिपंपाची वीज जोडणी आहे. या गावांना प्रत्येकी एक कर्मचारी, कोलगाव लौंढापूर ६0 घरगुती, ७0 कृषिपंप जोडणी असुन येथे एक कर्मचारी, आर्वी (लहान)५0 घरगुती व ५0 कृषीपंप आहेत. येथे एक कर्मचारी आहे. शिवाय टी. डी. पी. डी च्या कामाची जबाबदारी या कर्मचार्‍यांवर असते. या भागात ओलीताचे क्षेत्र असून सिंगल फेजमुळे ओलिताचा प्रश्न निर्माण होतो, वीज पुरवठा पूर्ववत करण्याकरिता कर्मचारी नसतात. शेतकर्‍यांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे घोराड येथील वीज कार्यालयातील रिक्तपद भरण्याची मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.(वार्ताहर)

 

Web Title: Ten employees in ten employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.