दूरध्वनी सेवेतील बिघाड कायम
By Admin | Updated: October 15, 2014 23:23 IST2014-10-15T23:23:30+5:302014-10-15T23:23:30+5:30
दूरध्वनी सेवेत आलेला तांत्रिक बिघाड अद्याप दुरुस्त करण्यात आला नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुरध्वनी, मोबाईल, इंटरनेट सेवा प्रभावित झाली असून ग्राहकांना संपर्क

दूरध्वनी सेवेतील बिघाड कायम
सेवाग्राम : दूरध्वनी सेवेत आलेला तांत्रिक बिघाड अद्याप दुरुस्त करण्यात आला नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुरध्वनी, मोबाईल, इंटरनेट सेवा प्रभावित झाली असून ग्राहकांना संपर्क साधण्यात व्यत्यय येत आहे. शिवाय ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक नाममात्र ठरत असून नागरिकांचे काम रखडली आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे सेवा प्रभावित झाली असून ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांचे नव्हे तर कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले आहे. हमदापूर आणि परिसरातील नागरिक बीएसएनएल कार्यालयात जाऊन तक्रार करतात. मात्र याकडे दोळेझाक करीत असल्याचा प्रत्यय येत आहे. हमदापूर येथे दूरसंचार विभागाचे एक्चेंज कार्यालय आहे. या अंतर्गत २५ ते ३० दूरध्वनी कनेक्शन आहेत. येथूनच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय येथील दुरध्वनी जोडले आहे. मात्र सेवा खंडित असल्याने येथील दुरध्वनी बंदच असतात. नागरिकांना गरज भासल्यास कार्यालयात जावे लागते. यात वेळेही खर्ची होतो. दूरध्वनी सेवेतील बिघाडामुळे इंटरनेट सेवा प्रभावित झाली. याकडे लक्ष तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची मगणी ग्राहकातून होत आहे.(वार्ताहर)