शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांची पंचायत; वेळीच उघडला नाही चार जणांचा गणिताचा पेपर, उडाला गोंधळ

By महेश सायखेडे | Updated: August 6, 2022 15:22 IST

एमएएच- सीईटी परीक्षेतील प्रकार

वर्धा : जिल्ह्यातील दोन केंद्रांवरून सध्या एमएएच- सीईटीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. शुक्रवारी तनया कम्प्युटर लॅब तसेच बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाॅजी या दोन्ही केंद्रांवरून शांततेत परीक्षा पार पडली. असे असले तरी शनिवारी याच दोन केंद्रांवरील तब्बल चार विद्यार्थ्यांचा गणिताचा पेपरच वेळीच तांत्रिक बिघाडामुळे उघडला नसल्याने एकच तारांबळ उडाली होती.

सुमारे एक तासांच्या प्रयत्नाअंती पेपर उघडल्यानंतर या चारही परीक्षार्थ्यांना दीड तासांचा कालावधी देत पेपर सोडविण्याची संधी देण्यात आली. असे असले तरी या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षार्थ्यांसह परीक्षा केंद्रांवरील अधिकाऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली होती.दोन खासगी कंपन्या घेत आहेत परीक्षाएमएएच-सीईटी ही परीक्षा जिल्ह्यातील दोन केंद्रांवरून घेतली जात असून ही परीक्षा दोन खासगी कंपन्यांच्या माध्यमातून घेतली जात आहे. दोन केंद्रांवरून शुक्रवारी ३०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिल्यानंतर शनिवारी तात्रिक अडचण निर्माण झाली होती.पेपर एकूण २०० गुणांचाभौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या तीन विषयांना अनुसरून घेतल्या जाणाऱ्या एमएएच-सीईटी ही परीक्षा एकूण २०० गुणांची आहे. गणिताला १०० तर उर्वरित दोन विषयांना १०० गुण आहेत. पण शनिवारी तनया कम्प्युटर लॅब तसेच बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाॅजी या दोन केंद्रावरील तब्बल चार विद्यार्थ्यांचा गणित विषयाचा पेपर वेळीच उघडला नसल्याने एकच तारांबळ उडाली होती. तांत्रिक अडचणीमुळे पेपर उघडला नसल्याचे लक्षात येताच तातडीने वरिष्ठांना माहिती देण्यात आली. त्यानंतर एक तासानंतर पेपर उघला आणि विद्यार्थ्यांनी पेपर सोडविला.राजपत्रिक अधिकाऱ्यांनी सांभाळली केंद्र प्रमुखाची जबाबदारवर्धा शहरातील तनया कम्प्युटर लॅब तसेच बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाॅजी या दोन केंद्रांवर केंद्र प्रमुख म्हणून राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाड येताच या दोन्ही अधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती देत योग्य कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर तांत्रिक दोष दूर करण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीwardha-acवर्धा