शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

शिक्षकांचे समायोजन; अनियमिततेचे गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:36 IST

जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळेतून संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समयोजनाची प्रक्रिया शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाकडून नुकतीच स्वावलंबी शिक्षण महाविद्यालयात पार पडली.

ठळक मुद्देनेत्यांची सोईप्रमाणे फिल्डींग : अनेकांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळेतून संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समयोजनाची प्रक्रिया शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाकडून नुकतीच स्वावलंबी शिक्षण महाविद्यालयात पार पडली. या समायोजन प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप समायोजन न झालेल्या शिक्षकांनी केला आहे.अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याचे सक्त आदेश शासनाने दिल्याने शिक्षणाधिकारी कार्यालयाने ही प्रक्रिया २५ तारखेपर्यंत पूर्ण न करता २८ तारखेला केली. अतिरिक्त शिक्षकांची यादी २७ च्या रात्रीला प्रसिद्ध केली. यादीत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना कुठलीही संधी न देता लगेच दुसऱ्या दिवशी १२ वाजता समायोजन स्थळी उपस्थित राहण्यास सांगितले. समायोजनस्थळी लावलेल्या यादीनुसार एकूण ६५ रिक्त जागेसाठी इयत्ता पाचवीचे ३६ तर इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी तसेच दहावीच्या ७२ शिक्षकांना बोलविण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या प्रक्रियेत ३० शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.समायोजन प्रक्रियेत काही शिक्षकांचे नेते पूर्णवेळ ठाण मांडून असल्याने त्यांच्याकडून सोईप्रमाणे फिल्डींग लावण्यात आली. यावर्षी आॅफलाईन समायोजन केल्याने अनेकांनी सोईप्रमाणे शाळांवर दावा सांगितला.त्यात त्यांना बºयापैकी यश आले. ज्या शिक्षकांचे समायोजन या प्रक्रियेत होऊ शकले नाही त्यांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार असल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही संपूर्ण प्रक्रिया वरिष्ठांनी तपासावी. त्यात अनियमितता आढळून आल्यास रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.संघटनेच्या नेत्यांची पत्नीसाठी धडपडसमायोजन प्रक्रिया सुरू असताना काही शिक्षक संघटनांचे नेते सकाळपासूनच तळ ठोकून होते. एका शिक्षक संघटनेच्या प्रमुख पदावर काम करणाºया सायंकार नामक नेत्याने आपल्या पत्नीसाठी जोरदार फिल्डींग लावली. त्यांची पत्नी लोक विद्यालय येथून अतिरिक्त ठरली. त्या यापूर्वी संजय गांधी येथे कार्यरत होत्या. संजय गांधी येथून अतिरिक्त ठरून त्या लोक विद्यालयात आल्या. लोक विद्यालयातून अतिरिक्त ठरविताना त्यांची नेमणूक २००४ अशी दाखविण्यात आली. अतिरिक्त शिक्षकांच्या पहिल्या यादीत त्यांची नेमणूक बरोबर दाखविली. अंतिम यादीत मात्र, संजय गांधी येथून १९९७ ची नेमणूक दाखवून त्या इयत्ता ६ ते ७ च्या गटात दुसºया क्रमांकावर आल्या. त्यामुळे त्यांना सोईप्रमाणे देवळीची जनता शाळा देण्यात आली. त्याच शाळेत कार्यरत निमजे नामक शिक्षिका या संजय गांधी मधून लोक विद्यालयात आल्या. परंतु, त्यांची नेमणूक लोक विद्यालयाची दाखविण्यात आली नाही. सायंकार यांनी पत्नीसाठी केलेल्या सेटींगमुळे देशमुख नामक शिक्षक सेवाज्येष्ठ असूनही त्याचे समायोजन होऊ शकले नाही. पर्यायाने त्यांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे. संघटना नेत्यांच्या या सेटींगमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.अतिरिक्त ठरविताना न्यायालयाच्या निर्णयाचा अवमानज्या शाळांनी चुकीच्या पद्धतीने शिक्षकांना अतिरिक्त ठरविले अशा शिक्षकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. अशा १० शिक्षकांना न्यायालयाने जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या या आदेशाप्रमाणे शिक्षणाधिकारी यांनी कोणत्याही शिक्षकाला अतिरिक्तच्या यादीत घेतले नाही. परंतु, माजी आमदार डायगव्हाणे यांच्या जिजामाता शाळेतील एका शिक्षकाला अतिरिक्त ठरवू नये असे न्यायालयाचे आदेश असतानाही शिक्षणाधिकाºयांनी शेवटच्या क्षणी अतिरिक्त ठरविले. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करीत दबातंत्राचा वापर करून त्यांना अतिरिक्त ठरविले अशी माहिती नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगण्यात आली. वास्तविक या शिक्षकाला समायोजनाच्या आदल्या दिवशी अतिरिक्त ठरत नसल्याचा निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला. एवढेच नव्हे तर या शिक्षकांची न्यायालयात याचिका असताना त्यांचे समायोजन करण्याचा चुकीचा निर्णय घेण्यात आला. एकूणच या संपूर्ण समायोजन प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप समायोजन न झालेल्या शिक्षकांनी केला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळावा म्हणू शिक्षकांनी ना. नागो गाणार यांच्याकडे तक्रार दिल्या आहेत.जि.प. शाळेत सहा तर खासगी प्राथमिक शाळेततीन शिक्षकांचे समायोजनइयत्ता ५ वीच्या ज्या शिक्षकांचे समायोजन माध्यमिक शाळेत होऊ शकले नाही अशा २४ शिक्षकांपैकी ६ शिक्षकांचे समायोजन जि.प.च्या शाळेत तर ३ शिक्षकांचे समायोजन खासगी प्राथमिक शाळेत करण्यात आले.उर्वरीत शिक्षकांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे. समायोजनाची प्रक्रिया सीईओ यांच्या समक्ष करण्यात आली. या प्रक्रियेत सावळा गोंधळ झाल्याचा आरोप होत असल्याने चौकशीची मागणी आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक