शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गृहरक्षक व मार्शलवर कायदेशीर कारवाई करा

By admin | Updated: January 16, 2016 02:34 IST

संशयास्पद स्थितीत असलेल्या कार व दुचाकीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाच एका मार्शल व गृहरक्षकाने खोट्या तक्रारीत ...

पोलीस अधीक्षकांना साकडे : खोट्या तक्रारीत फसविण्याची धमकीवर्धा : संशयास्पद स्थितीत असलेल्या कार व दुचाकीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाच एका मार्शल व गृहरक्षकाने खोट्या तक्रारीत अडकविण्याची धमकी दिली. सोबतच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार एकता मैदान परिसरात घडला. या प्रकरणी मार्शल सचिन दीक्षित व गृहरक्षक मंगल पांडे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले आहे.निवेदनानुसार, अमित कावळे, आकाश भक्ते, अमर कोटनाके तिघेही रा. तुकाराम वॉर्ड रामनगर हे ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता एकता मैदान परिसरातून जात होते. दरम्यान, त्यांना एक पांढऱ्या रंगाची कार व व दुचाकी ही दोन वाहने अंधारात मैदानाच्या कोपऱ्यावर संशयास्पद उभी दिसली. तिघेही शहानिशा करण्यासाठी वाहनाजवळ गेले असता दोन अल्पवयीन मुलींसोबत सचिन दीक्षित व मंगल पांडे त्यांच्या नजरेस पडले. काही विचारण्याच्या आतच त्या दोघांनी तीनही नागरिकांना धमकावणे सुरू केले. शिवाय आपण मार्शल व गृहरक्षक असल्याचे सांगत सोबत असलेल्या मुलींना शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्या मुलींना या तिघांबद्दल खोट्या तक्रारी दाखल करण्याच्याही सूचना केल्या. या तिघांनी वॉर्डातील देवस्थानचे अध्यक्ष महेश तेलरांधे यांना फोन केला. ते पोहोचेपर्यंत वाद सुरूच होता. गाडीची चावी मागितली असता त्या दोघांनी पुन्हा अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. तुम्ही माझे काहीच बिघडवू शकत नसल्याचेही सांगितले. यामुळे तेलरांधे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात फोन लावून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस घटनास्थळावर आले असता दीक्षित याने तिघांवरही खोटे आरोप करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मार्शल बनल्यापासून सचिन दीक्षित याने रामनगर परिसरात हैदोस घातल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यामुळे या दोघांविरूद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात तक्रारदारांसह महेश तेलरांधे, पवन राऊत, माया उमाटे, शुभांगी कोलते, चेतन खोंड, चुकेवार, येऊलकर आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)