धबधब्याच्या तलावात पोहणे जिवावर बेतले; दोघांना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 20:04 IST2022-10-28T20:03:19+5:302022-10-28T20:04:21+5:30
Wardha News दोन दिवसांपूर्वी रिधोरा येथील पंचधारा च्या घोगऱ्या धबधब्यावर पाण्यात डुबून एका युवकाचा मृत्यू झाल्याची बाब ताजी असताना आज परत दुपारी 5 च्या सुमारास 2 तरुणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

धबधब्याच्या तलावात पोहणे जिवावर बेतले; दोघांना जलसमाधी
वर्धाः दोन दिवसांपूर्वी रिधोरा येथील पंचधारा च्या घोगऱ्या धबधब्यावर पाण्यात डुबून एका युवकाचा मृत्यू झाल्याची बाब ताजी असताना आज परत दुपारी 5 च्या सुमारास 2 तरुणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चार तरुण रिधोरा येथील पंचधारा धरणावर फिरायला गेले होते. यातच ते धरणामागील घोगऱ्या धाब्यावर गेले असता त्यांना पोहण्याचा मोह झाला. पोहण्यासाठी चौघांनीही पाण्यात उडी घेतली, परंतू ते गटांगळ्या खाऊ लागल्याने स्थानिक युवकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते चौघेही एकमेकांचे केस धरून असल्याने यातील दोघांना वाचविण्यात यश आले तर दोघांचा या घटनेत मृत्यू झाला.
घटनेची माहिती सेलू पोलिसांना प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र कोहळे हे आपले सहकारी कर्मचाऱ्यासह घटना स्थळावर पोहचून घटनेचा पंचनामा केला. या चार वर्षांत पोहण्याच्या नादात जवळपास वीस तरुणांचा मृत्यू झाला परंतु या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याकडे कुणीच लक्ष दिले नाही.