दर्यापूरची अस्मिता काळे ठरली सूरसंगम स्मार्ट
By Admin | Updated: August 21, 2015 02:35 IST2015-08-21T02:35:28+5:302015-08-21T02:35:28+5:30
साहित्य कला शोधक मंचद्वारा मोहम्मद रफी यांच्या स्मृत्यर्थ आयोजित विदर्भस्तरीय फिल्मी गीतगायन स्पर्धा सुरसंगम स्मार्ट सिंगर विद्यादीप सभागृहात पार पडली.

दर्यापूरची अस्मिता काळे ठरली सूरसंगम स्मार्ट
सिंगरविदर्भस्तरीय फिल्मी गीत गायन स्पर्धा : साहित्य कला शोधक मंचाचा उपक्रम
वर्धा : साहित्य कला शोधक मंचद्वारा मोहम्मद रफी यांच्या स्मृत्यर्थ आयोजित विदर्भस्तरीय फिल्मी गीतगायन स्पर्धा सुरसंगम स्मार्ट सिंगर विद्यादीप सभागृहात पार पडली. यात दर्यापूर येथील अस्मिता काळे ही २०१५ ची स्मार्ट सिंगर ठरली.
या स्पर्धेत विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून नामवंत अशा ७८ स्पर्धकांनी भाग घेतला. प्रथम फेरीतून अंतिम फेरीत केवळ १२ स्पर्धकांचीच निवड करण्यात आली. परीक्षण सुप्रसिद्ध गझल गायक सुनील राहाटे, संगीततज्ज्ञ नरेंद्र माहुलकर, सुरेश सालबर्डे यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्या हस्ते माता सरस्वती व मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेला हारार्पण, दीप प्रज्वलनाने करण्यात आले. अंतिम फेरीमध्ये निवड झालेल्या बारा गायकांनी आपापल्या रचना सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अंतिम फेरीचे परीक्षण गायिका संध्या देशमुख, व्हायोलीन वादक वसंतराव जळीत, प्रा. वर्षा भालेराव यवतमाळ यांनी केले. यात दर्यापूर येथील अस्मिता काळे ही २०१५ ची स्मार्ट सिंगर ठरली. द्वितीय स्वामिनी सुभेदार वर्धा, तृतीय मुकेश मेहरा चंद्रपूर हे विजेते ठरले. प्रोत्साहन पुरस्कार प्रकाश गवारकर काचनगाव, प्रवीण पेटकर हिंगणघाट, सुरमयी पातुरकर यवतमाळ, प्रवीण सुपारे हिंगणघाट, प्रणय गोमासे चंद्रपूर, श्रूती गुळतकर दुष्यंत शिंगारे वर्धा, विनोद सोनवणे हिंगणघाट, सावेरी सोनी वर्धा यांना देण्यात आला.
स्पर्धेचे संचालन कार्यवाह दीपक मेने व संजय सदरानी यांनी केले. स्पर्धेला मंचचे प्रभाकर उगेमुगे, प्रमोद गुंडतवार, सुनील बुरांडे, प्रशांत चवडे, दीपक मेने, हरिष कनोजे, डॉ. विजय लोखंडे, सुनील काळे, चंद्रजीत टागोर, सुनील इंगोले, किशोर ढवळे, नितीन पटवर्धन, अमर काळे, पंकज घुसे, विलास कुळकर्णी, आनंद मून, श्रीकांत वाघ, प्रशांत हटवार, प्रकाश साहू, प्रा. सुनील अंभोरे, प्रा. सुतार आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)