सूरजने सर केले ‘नागणी देवी’ शिखर
By Admin | Updated: December 18, 2014 02:08 IST2014-12-18T02:08:28+5:302014-12-18T02:08:28+5:30
स्थानिक २१ महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत असलेल्या देवळी येथील एसएनएनजे़ महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा सार्जेंट सूरज किसना पोटफोडे याने...

सूरजने सर केले ‘नागणी देवी’ शिखर
वर्धा : स्थानिक २१ महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत असलेल्या देवळी येथील एसएनएनजे़ महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा सार्जेंट सूरज किसना पोटफोडे याने आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर उत्तरकाशी परिसरात असलेल्या हिमालय पर्वत रांगेतील १०,५०० फुट उंच ‘नागणी देवी’ शिखर सर करून नवा इतिहास रचला
सूरज पोटफोडे यांची निवड महाराष्ट्र एनसीसी निदेशालयाच्या वतीने नेहरू माऊंटनिअरिंग इंन्स्टिट्युट उत्तरकाशी येथे आयोजित १५ दिवसीय माऊंटनिअरिग शिबिराकरिता झाली होती़ त्याने सदर हिमालय पर्वतारोहन अभियानात सहभागी होवून ‘टेकला’ ‘चौरंगी खाल’ ‘यम द्वार’ व ‘संकुरणी धार’ शिखर पार करून अत्यंत खडतर मार्गाने चढाई करीत आठ नोव्हेंबर रोजी दुपारी २़४५ वा़ परिसरातील १०, ५०० फुट उंच असे सर्वोच्च ‘नागणी देवी शिखर’ सर केले़ या अभियानात भारतातून निवडक ९ एनसीसी कॅडेट्चा सहभाग होता़ शिबिराचा बेस कॅम्प ४५०० फुट उंचीवर स्थित होता़
शिबिरात रॉक क्लाईबिंग, रॅपेलिंग, रिव्हर क्रॉसिंग, चिमणी रॉक क्लाईबिंग, आपदा व बचाव पद्धतीचे प्रशिक्षण पर्वतारोहिंना देण्यात आले़
पदभ्रमंतीत मार्गावरील चॉकलेट्सचे रॅपर्स, पॉलिथीनच्या पिशव्या जमा करून त्याची विल्हेवाट लावून ‘किप हिमालया क्लिन अॅड ग्रिन’ चा संदेश दिला़ पदभ्रमंतीशिवाय पक्षी निरीक्षण, चित्रकला, पर्वत शृंखला, स्थानिक वृक्ष व निसर्ग अभ्यास तसेच प्रसिद्ध नागदेवी मंदिर, नचिकेता ताल व खंडोबा या स्थळांना भेटी देण्यात आल्या़ सूरजने १५ दिवसीय पर्वतारोहन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून नागणी देवी शिखर सर केल्याबद्दल त्याचे नेहरू माऊंटनिअरींग इंन्स्टिट्युटच्या वतीने कौतुक करण्यात आले.(प्रतिनिधी)