नालवाडीत टँकरने पाणी पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 21:38 IST2019-06-14T21:37:42+5:302019-06-14T21:38:13+5:30
शहरालगतच्या नालवाडी ग्रामपंचायत परिसरातील विहिरीसह बोअरवेलनेही तळ गाठल्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा करण्याकरिता टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी ग्रा.पं.च्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

नालवाडीत टँकरने पाणी पुरवठा करा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतच्या नालवाडी ग्रामपंचायत परिसरातील विहिरीसह बोअरवेलनेही तळ गाठल्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा करण्याकरिता टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी ग्रा.पं.च्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नालवाडी ग्रा.पं. परिसरातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटले आहे. तसेच जीवन प्राधिकरणच्या नळालाही पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्याकरिता टँकर उपलब्ध करुन द्यावा. यापूर्वीही पाणीटंचाई संदर्भातील ग्रा.पं.चा प्रस्ताव व खासदारांचे पत्रही पं.स.कडे सादर केले; पण अद्याप कार्यवाही झाली नसल्याने तत्काळ टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी तहसीलदार प्रीती डुडुलकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना उपसरपंच महेश शिरभाते यांच्यासह सदस्य वैभव सूर्यवंशी, रिता बनकर, अशांक कावळे, कविता खल्लारकर, गीता मडावी, कान्होपात्रा धनविज, सुनीता मेहरे-तडस, ईवनाते, वैशाली सातपुते, प्रतिभा वाळके, अमोल मानकर, किशोर कुहीकर, सतीश काचोळे, नरेश रुद्रकार, योगीता उईके, बाळा माऊसकर हजर होते.