शेतकऱ्यावर कारवाई केल्याने विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 06:00 AM2019-11-15T06:00:00+5:302019-11-15T06:00:27+5:30

मोई (तांडा) येथील रामकिसन सरदार राठोड (४५) यांच्याकडे सव्वाचार एकर शेती आहे. सततची नापिकी व दुष्काळाने त्यांनी आधीच धसका घेतला होता. साडेचार लाखाचे कर्जही होते. अशातच त्यांना घरगुती वापराचे बिल आले. मात्र परिस्थिती अभावी बिल भरले नाही. ७ ला त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यांना सार्वजनिक वीजेच्या खांबावर हूक टाकून घरी पुरवठा सुरू केला.

Suicide by poisoning by taking action on farmers | शेतकऱ्यावर कारवाई केल्याने विष प्राशन करून आत्महत्या

शेतकऱ्यावर कारवाई केल्याने विष प्राशन करून आत्महत्या

Next
ठळक मुद्देअभियंता,लाईनमनवर कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : घरगुती वापराचा वीजपुरवठा बिल न भरल्याने महावितरण कंपनीच्या अभियंत्याने खंडीत केला होता. यासाठी १५ हजार दंडही ठोठावला. कारवाईच्या भितीपोटी शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली. सदर घटना बुधवारी घडली. याप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी कुटुंबियांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
मोई (तांडा) येथील रामकिसन सरदार राठोड (४५) यांच्याकडे सव्वाचार एकर शेती आहे. सततची नापिकी व दुष्काळाने त्यांनी आधीच धसका घेतला होता. साडेचार लाखाचे कर्जही होते. अशातच त्यांना घरगुती वापराचे बिल आले. मात्र परिस्थिती अभावी बिल भरले नाही. ७ ला त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यांना सार्वजनिक वीजेच्या खांबावर हूक टाकून घरी पुरवठा सुरू केला. याची माहिती वायरमन ढोबळे यांना मिळाली. त्यांनी अभियंता अतकरे यांना कळविले. अतकरे यांनी राठोड यांच्याघरी धाड टाकली. मीटर व वायर जप्त केला. १५ हजारांचा दंडही दिला.
या कारवाईचा धसका घेतल्याने त्यांनी १३ ला आष्टीच्या वीज वितरण कंपनी कार्यालयात येवून न्याय मागितला. ७५० रुपये बिल भरतो. कारवाई करू नका. दंड माफ करा अशी विनंती केली. मात्र अभियंता अतकरे यांनी काहीही ऐकुन न घेता शेतकºयांला धमकावले. अभियंत्याच्या धमकीमुळे वैफल्यग्रस्त रामकिसन राठोड यांनी मोई गाव गाठले. दुपारी १ वाजता घरातच विषारी औषध प्राशन केले. गावकºयांना माहिती होताच उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टर गैरहजर असल्याने त्यांच्यावर कोणीही उपचार केले नाही. त्यांना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील आहे. याप्रकरणी अभियंता अतकरे, लाईनमन ढोबाळे यांच्या विरोधात आष्टी पोलिसात तक्रार देण्यात आली. जिल्हाधिकाºयांना निवेदन पाठविण्यात आले. शवविच्छेदन झाल्यावर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

शेतकºयाने माझ्याकडे येवून माहिती दिली असती तर उपाययोजना करता आली असती याप्रकरणी वरिष्ठांना माहिती देण्यात आली. अभियंता व लाईनमन यांची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला जाणार आहे.
-आर.एम. खडसे, उपविभागीय अभियंता, वीज वितरण कंपनी, आष्टी (शहीद).

Web Title: Suicide by poisoning by taking action on farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू