वर्ध्यात दोन मुलांसह मातेची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 14:09 IST2019-08-30T14:09:02+5:302019-08-30T14:09:30+5:30
सावंगी मेघे येथील भूगावमध्ये असलेल्या विवेशल कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.

वर्ध्यात दोन मुलांसह मातेची गळफास लावून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सावंगी मेघे येथील भूगावमध्ये असलेल्या विवेशल कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.
येथे राहणाºया सविता आशिष साहू (३१), ओरा आशिष साहू (३) व आयुष आशिष साहू (८) या तिघांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरात आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केले. या दोन्ही मुलांचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाल्याचे तर महिलेने गळफास घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले. सावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धोंगडे, राजेंद्र उराडे, जवादे यांच्या चमूने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटेनची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली आहे.