सुधाकर घोडेचे आजीवन सभासदत्व रद्द
By Admin | Updated: August 24, 2014 23:41 IST2014-08-24T23:41:11+5:302014-08-24T23:41:11+5:30
सरस्वती माता शिक्षण प्रसारक मंडळ, ठाणेगावचे सचिव सुधाकर घोडेच्या मनमानी धोरणाविरुद्ध संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सन २००८ मध्ये सेक्शन ४१-डी महाराष्ट्र पब्लीक ट्रस्ट

सुधाकर घोडेचे आजीवन सभासदत्व रद्द
कारंजा (घा.): सरस्वती माता शिक्षण प्रसारक मंडळ, ठाणेगावचे सचिव सुधाकर घोडेच्या मनमानी धोरणाविरुद्ध संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सन २००८ मध्ये सेक्शन ४१-डी महाराष्ट्र पब्लीक ट्रस्ट कायद्याअंतर्गत धर्मदाय सहआयुक्त नागपूर यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर शहानिशा करून धर्मदाय सहआयुक्त ए. पी. मेते यांनी घोडेच्या विरोधात निकाल देत संस्थेतील मुळ सभासदत्व रद्द केले. निकालामुळे घोडेच्या प्रशासकीय अधिकारावर गंडातर आले आहे.
यापुर्वी सुद्धा एका निर्णयाद्वारे घोडेच्या सचिवपदाचे अधिकार रद्द करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर घोडेने सादर केलेला संस्थेचा चेंज रिपोर्टसुद्धा, धर्मदाय उपआयुक्त वर्धा यांनी १४ आॅक्टोबर २०१३ ला नामंजुर केलेला आहे. अर्जदार तुकाराम गाखरे, तुकाराम डोंगरे यांनी गैरअर्जदार सुधाकर घोडे विरुद्ध सेक्शन ४१-डी अंतर्गत, धर्मदाय सहआयुक्त नागपूर यांच्याकडे विनंती अर्ज करून मुळ सभासद क्र.रद्द करण्याची मागणी केली होती. यावेळी घोडेवर आठ गंभीर आरोप केले होते.
सन २००३ पासून घोडेने सक्षम अधिकाऱ्याकडे संस्थेचे लेखा परीक्षण अहवाल सादर केला नाही. शिष्यवृत्ती उचलून विद्यार्थ्यांना वाटप केली नाही. व्यायामशाळा बांधकामाकरिता शासनाच्या मिळालेल्या अनुदानाचा गैरवापर केला. रूपाली घोडे यांना शाळा समितीचा ठराव न घेता नियुक्तीचा आदेश दिला.
कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम २ लाख ७२ हजार ५२० रुपये शासनाकडे वेळेच्या आत ‘न’ भरता गैरवापर केला. सक्षम अधिकाऱ्याची परवानगी ‘न’ घेता संस्थेची जागा दुसऱ्या संस्थेला दिली अशा प्रकारचे गंभीर आरोप, तक्रारी मध्ये करण्यात आले होते. यातील आठ पैकी सहा आरोप सिद्ध झाल्यामुळे सहआयुक्तांनी सुधाकर घोडे यांचे मूळ सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय दिला. (तालुका प्रतिनिधी)