जोडमोह वृक्षाच्या फांद्यांना अचानक आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:07+5:30
इ. स. १८०० शेच्या सुमारास महाराज परिसरात भ्रमण करीत असताना याच जोडमोहाच्या झाडाखाली विश्राम करायचे. हे स्थळ आजनसरा-वडनेर मार्गावर फुकटा गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. येथे भाविक पुरण पोळीचा स्वयंपाक घेऊन येतात.

जोडमोह वृक्षाच्या फांद्यांना अचानक आग
लोकमत न्यूज नेटवर्क
आजनसरा : आजनसरा येथील श्री संत भोजाजी महाराजांचे विश्राम स्थान असलेले फुकटा शिवारातील जोडमोह या झाडाच्या फांद्यांनी बुंध्यापासून ३० ते ४० फुंटापर्यंत अचानक पेट घेतला.
भोजाजी ग्रंथात या स्थळाची आख्यायिका असून इ. स. १८०० शेच्या सुमारास महाराज परिसरात भ्रमण करीत असताना याच जोडमोहाच्या झाडाखाली विश्राम करायचे. हे स्थळ आजनसरा-वडनेर मार्गावर फुकटा गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. येथे भाविक पुरण पोळीचा स्वयंपाक घेऊन येतात. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास या जोडमोह झाडाच्या केवळ फांद्यांनी वरचेवर पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. परिसरात चर्चेला उधाण आले.
घटनेविषयी श्री संत भोजाजी महाराजांचे सातवे वंशज शासकीय जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य भास्करराव कोसुरकर यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हिंगणघाट येथील अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझविण्यात आली. वडनेर पोलिसांनीसुद्धा घटनास्थळी भेट दिली. या स्थळाची पाहणी केली असता दोन्ही झाडाचे खोड पूर्णपणे सुरक्षित असून केवळ झाडाच्या फांद्या जळालेल्या आहेत.