गॅस ग्राहकांच्या खात्यात जमा होणार अनुदान होणार
By Admin | Updated: November 12, 2014 22:48 IST2014-11-12T22:48:28+5:302014-11-12T22:48:28+5:30
गॅस ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम १५ नोव्हेंबर पासून जमा होणार आहे़ गॅस ग्राहकांकडे राष्ट्रीयकृत बँकेचे बचतखाते तसेच आधारकार्ड असणे आवश्यक असून अद्यापपर्यंत आधारकार्ड व बचतखाते

गॅस ग्राहकांच्या खात्यात जमा होणार अनुदान होणार
वर्धा : ^ गॅस ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम १५ नोव्हेंबर पासून जमा होणार आहे़ गॅस ग्राहकांकडे राष्ट्रीयकृत बँकेचे बचतखाते तसेच आधारकार्ड असणे आवश्यक असून अद्यापपर्यंत आधारकार्ड व बचतखाते नसलेल्या ग्राहकांनी तत्काळ बचत खाते व आधारकार्ड काढण्याचे जिल्हाधिकारी एऩनवीन सोना यांनी कळविले आहे़
जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात केंद्र शासनाच्या एमडीबीटीएल योजनेंतर्गत १५ नोव्हेंबर पासून अनुदानाची रक्कम थेट बँकेत जमा करण्याच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी एऩनवीन सोना यांनी आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते़
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक अनंत भिसे, भारत पेट्रोलियमच्या मिश्री कोटकर, हिंदुस्थान पेट्रोलियमचे लोकेश सक्सेना व इंडियन आॅईलचे वरिष्ठ अधिकारी जयंत पाटील उपस्थित होते़
केंद्र शासनाने एलपीजी ग्राहकांना अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या बचतखात्यात १५ नोव्हेंबर पासून जमा करण्याचा निर्णय घेतला असून, वर्धा जिल्ह्यातील २ लक्ष २२ हजार ४४३ गॅस ग्राहकांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. या बाबत माहिती देताना जिल्हाधिकारी एऩनवीन सोना म्हणाले की, जिल्ह्यात २२ गॅस वितरकांकडून सिलिंडरचा पुरवठा सुरू आहे़ गॅस ग्राहकांना आधारकार्ड व बँक खाते आवश्यक करण्यात आल्यामुळे २ लक्ष ४ हजार ६८९ ग्राहकांनी आधारकार्ड काढले आहे़ १ लक्ष ८५ हजार ०५ ग्राहकांची राष्ट्रीयकृत बँकेत बचतखाते असून ते एजन्सीसोबत संलग्न आहे़
गॅसच्या अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होण्याच्या दृष्टीने अद्यापपर्यंत बँक खाते उघडले नाही त्यांनी प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत जवळच्या बँकेत खाते उघडावे तसेच आधारकार्डसुद्धा येत्या तीन महिन्यात काढून गॅस अनुदानासाठी गॅस वितरकांकडे जमा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
जिल्ह्यात इंण्डेन आॅईल कंपनीचे ११ वितरक, भारत पेट्रोलियमचे तीन तर एचपीसीएलच्या आठ वितरकामार्फत गॅसचा पुरवठा सुरू आहे़ आॅईल कंपन्यांनीही गॅस ग्राहकांना आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडण्यासाठी मार्गदर्शन करावे़ १४ नोव्हेंबर पर्यंत ज्या ग्राहकांचे बँक खाते नाहीत त्यांना बँकेत बचतखाते सुरू करण्यासंबंधी राष्ट्रीयकृत बँकासोबत समन्वय करून बचत खाते उघडण्यास अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बचत खात्यात जमा होऊ शकेल़ आधार संलग्न असलेल्या गॅस वितरकाकडे आधारकार्ड अनुदानासाठी संलग्न झाले आहेत़ जिल्हा पुरवठा अधिकारी सवाई यांनी जिल्ह्यातील अनुदानाबाबत सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली़(प्रतिनिधी)