लोकमतच्या साक्षीने विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश

By Admin | Updated: June 27, 2015 02:48 IST2015-06-27T02:48:30+5:302015-06-27T02:48:30+5:30

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत लोकमतचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे. बालविकास मंच व लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेच्या माध्यमातून...

Students will be admitted to the school | लोकमतच्या साक्षीने विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश

लोकमतच्या साक्षीने विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश

वर्धा - विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत लोकमतचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे. बालविकास मंच व लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेच्या माध्यमातून बालमानाला चालना देण्याचे काम लोकमत नेहमीच करीत आला आहे. विद्यार्थीही आवर्जून लोकमत वाचत असतात. शुक्रवारपासून सर्वत्र शाळा सुरू झाल्या. मुलांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांचा सवंगडी असलेल्या बालमंचची त्यांना पुन्हा नव्याने उजळणी व्हावी या उद्देशाने लोकमतच्यावतीने अनेक शाळांमध्ये गुलाबपुष्पाने नवागतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह लोकमत आणि बालमंच वरील त्यांचे प्रेम दाखवित होता. यंदाही राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

Web Title: Students will be admitted to the school