शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना सुटी, शिक्षक-कर्मचारी कर्तव्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

राज्य शासनाने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ राज्यात १३ मार्च पासून लागू केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी राज्यातील मनपा, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र तसेच महाविद्यालये आणि व्यवसाय प्रशिक्षण केंंद्र आयुक्त यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था तसेच अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंध : प्रशासनाच्या आवाहनाला साद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना व्हायरसला पायबंद घालण्याच्या दृष्टीने सर्व अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला केल्या होत्या. त्यानुसार सोमवारी अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. मात्र, शाळेतील शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी आपल्या कर्तव्य बजावत होते. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनीही साथ दिल्यास कोरोनाला पळवून लावण्याकरिता वेळ लागणार नाही.राज्य शासनाने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ राज्यात १३ मार्च पासून लागू केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी राज्यातील मनपा, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र तसेच महाविद्यालये आणि व्यवसाय प्रशिक्षण केंंद्र आयुक्त यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था तसेच अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे. मात्र, या आदेशाबद्दल ग्रामीण आणि शहरी भाग यासंदर्भात अनेकांमध्ये संभ्रमावस्था होती. सोमवारी सकाळी बहुतांश शाळा, महाविद्यालये सकाळी नियोजित वेळेमध्ये उघडण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनांनी संपर्क साधून खातरजमा करून विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार अंगणवाडी, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा हा आदेश शहरासह ग्रामीण भागाकरिताही लागू असल्याने आता ३१ मार्चपर्यंत सर्वत्र शाळा, महाविद्यालये बंद राहणार असून शिक्षक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहून आपले कामकाज पूर्ण करायचे आहे.कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून शासनाच्या आदेशानुसार शहर व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे या काळात अध्यापन बंद राहणार असून शालेय कामकाज शिक्षक व कर्मचाऱ्यांना करायचे आहे.-उल्हास नरड, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

टॅग्स :Schoolशाळा