शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रशियातील विद्यार्थ्यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 14:16 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये रशियात अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा लोकमतच्या पाठपुराव्यानंतर मायदेशी परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. १७ जून रोजी दीडशेवर विद्यार्थी परतीचा प्रवास सुरू करतील.

ठळक मुद्दे१७ जूनला परतीचा प्रवास विदर्भातील दीडशे विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये रशियात अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा लोकमतच्या पाठपुराव्यानंतर मायदेशी परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. १७ जून रोजी दीडशेवर विद्यार्थी परतीचा प्रवास सुरू करतील. रशियातील विविध वैद्यकीय विद्यापीठांत महाराष्ट्रातील हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत असून यात विदर्भातील दीडशे विद्यार्थ्यांचा समावेश आहे.कोरोनाने रशियात अक्षरश: थैमान घातले असून यामुळे कठोर टाळेबंदी लागू आहे. विद्यार्थ्यांना विदेशातील ही टाळेबंदी अत्यंत जाचक ठरत असून त्यांची मोठी कोंडी झाली आहे. याविषयी हे विद्यार्थी पालकांना दररोज कळवितात. मात्र महाराष्ट्रात विमान उड्डाण करण्यास मनाई असल्याने परतीच्या प्रवासाची अडचण निर्माण झाली होती. प्रवासाबाबत मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. भारतातील अन्य राज्यांप्रमाणेच राज्याच्या अन्य विमानतळावर रशियातून थेट विमान पाठविण्याचा दाखला विद्यार्थ्यांनी दिला होता. यासंदर्भात आमदार डॉ. पंकज भोयर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर भाजपचे जिल्हा महामंत्री अविनाश देव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे व्यथा मांडली.गडकरी यांनी रशियातील भारतीय दुतावास तसेच विदेश मंत्रालयाकडे विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासाबाबत पाठपुरावा केला. महाराष्ट्र शासनाच्या परवानगीनंतरच राज्यातील प्रवास शक्य होणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्या दृष्टीने पत्रव्यवहार झाला. अखेर संमती मिळाल्याने १७ जून रोजी १६८ विद्यार्थ्यांना घेऊन येणारे विमान दिल्लीला १८ जूनला पोहोचेल. त्यानंतर दिल्ली ते नागपूर असा प्रवास होणार आहे. सुरुवातीचे सात विद्यार्थ्यांना नागपुरातच इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावे लागणार असून हा सर्व खर्च विद्यार्थ्यांनाच सोसावा लागणार आहे. एरवी २० ते २५ हजार रुपयांत प्रवास आता ५१ हजार रुपयांना पडणार आहे. मात्र, खर्च ही दुय्यम बाब आहे, असे मत अडकलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले आहे. विशेष बाब म्हणजे, रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याबाबत लोकमत'ने सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच रशियन दुतावासातील बिनया श्रीकांत प्रधान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामात मोठा पाठपुरावा केल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महाराष्ट्रातील विद्यार्थी रशिया, कझाकिस्तान व इतर देशांत वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचे पालक प्रत्यक्ष भेटून तसेच ई-मेलच्या माध्यमातून मायदेशी परत आणण्याकरिता विनंती करीत होते. विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता आवश्यक माहिती व यादी पाठवून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि एस. जयशंकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर मागणीला यश आले.-रामदास तडस,खासदार, वर्धा लोकसभा

टॅग्स :Studentविद्यार्थीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस