प्रवासी निवाऱ्याकरिता विद्यार्थी रस्त्यावर
By Admin | Updated: July 28, 2014 23:39 IST2014-07-28T23:39:55+5:302014-07-28T23:39:55+5:30
तालुक्याचे ठिकाण असलेल्या या गावात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रवासादरम्यान बसची प्रतीक्षा करताना उभे राहण्याकरिता कुठलीही व्यवस्था नाही. येथे नवे बसस्थानक तयार करण्यात आले

प्रवासी निवाऱ्याकरिता विद्यार्थी रस्त्यावर
तहसील कार्यालयावर मोर्चा : विविध मागण्यांचे निवेदन सादर
समुद्रपूर: तालुक्याचे ठिकाण असलेल्या या गावात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रवासादरम्यान बसची प्रतीक्षा करताना उभे राहण्याकरिता कुठलीही व्यवस्था नाही. येथे नवे बसस्थानक तयार करण्यात आले मात्र त्याचा नागरिकांना कुठलाही उपयोग नाही. यामुळे संतापलेल्या येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी विविध मागण्यांचे निवदेन तहसीलदार तिनघसे यांना देण्यात आले.
समुद्रपूर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे प्रशासकीय कार्यालये, महाविद्यालय व अन्य कामाकरिता बाहेगावावरून विद्यार्थी तसेच नागरिक येत असतात. परंतु गत सात ते आठ वर्षापासून प्रवाशांना थांबण्याकरिता प्रवासी निवारा नाही. पावसाचे दिवस सुरू आहेत. अशात विद्यार्थ्यांना व प्रवाशांना पान टपरी, चाहाची टपरी व इतर दुकानाचा आधार घ्यावा लागतो. नवीन बसस्थानक हे समुद्रपूरपासूप १ किलो मिटरच्या बाहेर आहे. तिथे कोणी जायला तयार नाही. बसस्थानकावर पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही. येथे येणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना होणारा त्रास टाळण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्याची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लावण्याबाबत मागणी करण्यात आली. या वेळी करण्यात आलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आठ दिवसांनंतर तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे विद्यार्थी संघटनेने दिला आहे. तहसीलदारांना निवदेन देताना आशिष अंड्रस्कर, मनिष गांधी, अमोल व सौरभ साळवे यांच्यासह योगेश आसुटकर, याज्ञिक सोनुलकर, पंकज रोक, अतुल चौधरी, आकाश चाफले, अर्जून करवे, वैभव साळवे, रज्जत साळवे, व विद्यार्थी उपस्थिती होती.(तालुका/शहर प्रतिनिधी)