प्रवाहित विद्युत तारेच्या स्पर्शाने विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 15:39 IST2018-06-09T15:39:42+5:302018-06-09T15:39:42+5:30

शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या मुलाचा मृत्यू

student died after touching electric wire | प्रवाहित विद्युत तारेच्या स्पर्शाने विद्यार्थ्याचा मृत्यू

प्रवाहित विद्युत तारेच्या स्पर्शाने विद्यार्थ्याचा मृत्यू

वर्धा : प्रवाहित विद्युत तारेच्या स्पर्शानं विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना सेलू तालुक्यात घडली आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. आदेश अनिल ढगे असं मृत मुलाचं नाव असून तो नुकताच दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. 

आदेश ढगे हा चंदू सुटे यांच्या यांच्या शेतात रोजंदारीनं काम करत होता. शेतात पोहोचण्यास उशीर झाल्यानं आदेश घाईनं शेतात जात होता. त्यावेळी त्याचा स्पर्श प्रवाहित विद्युत तारेला झाला. हा प्रकार शेतमजूरांच्या लक्षात येताच त्यांनी आदेशला स्थानिकांच्या मदतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात नेलं. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

Web Title: student died after touching electric wire