शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

स्वच्छ ‘वणा’साठी काढला धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:22 PM

शहर तसेच जवळपासच्या अनेक गावांची जीवनदायीनी असलेल्या वणा नदीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. शहरातील सांडपाणी, अवैध रेती उपसा, वृक्षतोड, नदीत टाकण्यात येणाऱ्या कचºयामुळे ही नदी प्रदुषित होत आहे. स्वच्छ वणा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शहरातून मोर्चा काढून उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आहे. या मोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ठळक मुद्देयोग्य कार्यवाहीसाठी एसडीओंना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहर तसेच जवळपासच्या अनेक गावांची जीवनदायीनी असलेल्या वणा नदीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. शहरातील सांडपाणी, अवैध रेती उपसा, वृक्षतोड, नदीत टाकण्यात येणाऱ्या कचºयामुळे ही नदी प्रदुषित होत आहे. स्वच्छ वणा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शहरातून मोर्चा काढून उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आहे. या मोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.गेल्या कित्येक वर्षांपासून वणा नदीच्या विद्रुपिकरणात भर पडत आहे; पण त्याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याच अनुशंगाने विचार मंथन करून वणा नदीचे अस्तित्व अबाधीत राखण्यासाठी वणा नदी संवर्धन समितीच्यावतीने बुधवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात हिंगणघाट शहरातील एकूण ४० विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, व्यापारी, किराणा, कपडा, मेडिकल्स, डॉक्टर असोसीएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चाने मोहता चौक, टिळक चौक असे मार्गक्रमण करीत वणा नदी परिसर गाठला. या ठिकाणी आंदोलनात सहभागींनी ‘मी नदी अस्वच्छ करणार नाही व तिचे पावित्र्य जपेल’ अशी शपथ घेतली. यावेळी काहींनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, समितीचे अध्यक्ष रूपेश लाजूरकर, अनिल जवादे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी सुनील डोंगरे, आशिष भोयर, अ‍ॅड. सुधीर कोठारी, अ‍ॅड. सागर हेमके, गजू कुबडे, अनिल भोंगाडे, अतुल हूरकट, शुभांगी डोंगरे, प्रदिप नागपूरकर, इकबाल पहलवान, श्याम ईडपवार यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर या मोर्चाने उपविभागीय महसूल कार्यालय तसेच तहसील कार्यालय गाठले. तेथे अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शिवाय त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. तहसीलदार मुंधडा यांनी आंदोलकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत तातडीने योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर उपविभागीय महसूल अधिकारी खंडाईत यांनीही निवेदन स्विकारून योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच ३ जुलैला नगरपालिका, पाटबंधारे विभाग, आरोग्य, महसूल, कृषी, जीवन प्राधिकरण आदी विभागांच्या अधिकाºयांची बैठक बोलावू असेही सांगितले.स्वच्छ आणि सुंदर हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने विविध सामाजिक संघटनांनी आम्ही एक आहो असाच संदेश दिला. वणा नदी संवर्धन समितीच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या यशस्वीतेकरिता समितीचे सचिव अशोक मोरे, धनराज कुंभारे, पंकज साबळे, तुषार हवाईकर, निरज हवाईकर, संदेश मून, सनी बासनवार, उमेश डेकाटे, सचिन ऐलकुंचवार, अशोक पवनीकर, मयूर तुमाने, दिनेश वर्मा, राकेश शर्मा, प्रशांत बेंडे, डॉ. बि. आर. आंबेडकर शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी विशेष सहकार्य केले.