आरोग्य कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांना साकडे

By Admin | Updated: December 24, 2014 23:05 IST2014-12-24T23:05:30+5:302014-12-24T23:05:30+5:30

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय गाठून आपली समस्या मांडली.

Strengthen the health workers | आरोग्य कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांना साकडे

आरोग्य कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांना साकडे

वर्धा : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय गाठून आपली समस्या मांडली. यावेळी झालेल्या चर्चेअंती आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या १५ दिवसात निकाली काढण्याची ग्वाही ग्वाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण यांनी दिली.
यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा नियोजित तारखेस करण्यात यावे. आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१४ पासून प्रलंबित असलेले वेतन अदा करण्यात यावे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेकडून करण्यात यावे. सर्व प्रा.आ. केंद्राचे वेतनाचे वित्तप्रषण त्वरित देण्यात यावे, तसेच दरमहा एक तारखेस वेतन व्हायला पाहिजे, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
संबंधित लिपिक, संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत वस्तुनिष्ट चर्चा करून आठ दिवसांत अहवाल देण्यात यावा, असे सांगितले असता सहायक प्रशासन अधिकाऱ्याने मुद्दा गुंतागुंतीचा असल्यामुळे वेळ लागेल, ही बाब लक्षात आणून दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी १५ दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश यंत्रणेला दिले.
सन २०१३ पर्यंत १२ वर्ष कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आलेला असून उर्वरित सर्व व २४ वर्ष आश्वासित प्रगती योजना लाभ देण्याकरिता गोपनीय अहवाल तपासणे सुरू आहे. त्वरीत लाभ देण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी गुंडतवार, स.प्र.अ. चावरीपांडे, कोरान्ने, चावरे तर संघटनेच्यावतीने दिलीप उटाने, राज्यकार्याध्यक्ष, सिद्धार्थ तेलतुंबडे, सचिव रतन बेंडे, कार्याध्यक्ष सुजता कांबळे, नलिनी उबदेकर, प्रभाकर सुरतकर, विजय वांदिले, बाबाराव कनेर, दीपक कांबळे, शंकर हाते, अविनाश चव्हाण, विजय जांगडे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Strengthen the health workers