धनगर समाजाचा रास्तारोको
By Admin | Updated: August 14, 2014 23:51 IST2014-08-14T23:51:08+5:302014-08-14T23:51:08+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याकरिता निर्णय घेण्यात आला; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. ुअशात शासनाने नव्याने आरक्षण मागणाऱ्या

धनगर समाजाचा रास्तारोको
आरक्षणाची मागणी : पवनारजवळ नागपूर मार्ग जाम
पवनार : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याकरिता निर्णय घेण्यात आला; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. ुअशात शासनाने नव्याने आरक्षण मागणाऱ्या समाजाकरिता तिसरी सूची जाहीर करण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीतच आरक्षण देण्यात यावे, अशी भूमिका धनगर समाजाने घेतली. ही मागणी पूर्ण करण्याकरिता गुरुवारी राज्यभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता पवनार येथे रास्ता रोको करण्यात आले.
धनगर समाज संघर्ष कृती समितीच्यावतीने पवनार येथील बस स्थानकाजवळ चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची पूर्ण कल्पना पोलिसांना असल्याने बसस्थानक चौकात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीत जवळपास दहा मिनिटे हे आंदोलन झाले. यामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
आंदोलनादरम्यान भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४, १५, १६, २४४, ३३५, ३४२ व परिशिष्ट पाच नुसार धनगर, धनगड व ओरॉन या जमाती अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे. असे असताना महाराष्ट्र शासन सवलतींची अंमलबजावणी करण्याचे हेतुपुरस्पर टाळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या बाबत शासनानाला वेळोवेळी निवदेन दिली. तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
अखेर धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी धनगर कृती समितीच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू करण्यात आली. पहिले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीकरिता साखळी आंदोलन झाले. नंतर मोर्चा काढत जिल्हाकचेरीत मेंढ्या नेण्यात आल्या. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारी पवनार येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात समाज बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनापूर्वीच पोलीस ताफा तैनात असल्याने आंदोलनाला मोठे स्वरुप आले नाही. दहा मिनिटे चक्काजाम झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलीस बंदोबस्तामुळेच गावकऱ्यांना चक्काजाम होणार असल्याची माहिती मिळाली. चक्काजाम आंदोलन अतिशय शांततेने पार पडले. आंदोलनाचे नेतृत्व राजू गोरडे, हितेंद्र बोबडे, पुरूषोत्तम हुलके, श्रीधर लाभे, कृष्णा कुहीटे, गणेश हुगे, विनायक नन्नावरे, दिनकर तिनघसे, राजू बनकर, सिद्धार्थ खराबे यांनी केले. सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून मार्ग मोकळा केल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. (वार्ताहर)