अजबच प्रकार! वाहन घरासमोर उभे आणि तिकडे फास्टॅगद्वारे कापली गेली टोलची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 13:14 IST2021-08-18T13:13:45+5:302021-08-18T13:14:09+5:30
Wardha News पुलगाव येथील सुधीर बांगरे यांचे चारचाकी वाहन घरी उभे असतानाही त्यांच्याकडून आॅनलाइन पद्धतीने टोल वसूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.

अजबच प्रकार! वाहन घरासमोर उभे आणि तिकडे फास्टॅगद्वारे कापली गेली टोलची रक्कम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: पुलगाव येथील सुधीर बांगरे यांचे चारचाकी वाहन घरी उभे असतानाही त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने टोल वसूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी बांगरे यांनी केली आहे. (Toll cutting by Fastag while vehicle was at home )
भाजपचे व्यापारी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुधीर बांगरे यांच्याकडे एमएच ३२ सी ६२०२ क्रमांकाची कार आहे. त्यांनी टोल भरण्यासाठी फास्टॅग ही सुविधा घेतली आहे. १५ ऑगस्टला त्यांचे वाहन घरी उभे असतानाही त्याच्या वाहनाने पांढरकवडा-अदिलाबाद मार्गावरील टोल नाका पार केल्याचा मेसेज टाकून त्यांच्या फास्टॅग पेटीएममधून ८५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. पैसे कापले गेल्याचा संदेश येताच सुधीर बांगरे यांच्या भुवया उंचावल्या. हा प्रकार नेमका काय, असा प्रश्न सुधीर बांगरे यांच्यासमोर असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बांगरे यांनी केली आहे.