सेलू तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : परिसरात एक दिवसापूर्वीच वादळाने कहर करून शेतकऱ्यांच्या केळीच्या बागासह घरावरील छत, झाडे सपाट करीत ...

Storm hits Selu taluka | सेलू तालुक्याला वादळाचा तडाखा

सेलू तालुक्याला वादळाचा तडाखा

ठळक मुद्देवीजतारा, झाडे उन्मळूृन पडली, अनेक घरे व गोठ्यांवरील टिनपत्रेही उडाली




लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : परिसरात एक दिवसापूर्वीच वादळाने कहर करून शेतकऱ्यांच्या केळीच्या बागासह घरावरील छत, झाडे सपाट करीत लाखोंची हानी केली. पुन्हा एकाच दिवसाच्या फरकाने आलेल्या सुसाट चक्रीवादळाने उर्वरित केळी पिकांची वाट लागली. घरावरील छत, टिनपत्रे दूरपर्यंत उडून गुले. रस्त्याच्या कडेला असलेला एक लोखंडी पानठेला २०० मीटर उडून गेला. सेलू, बेलगाव व आजूबाजूच्या काही गावांना मोठा फटका बसला. इतरही गावात वादळाने मोठे नुकसान केले. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिल्याच वादळातील तुटलेला वीजतारा खांब सुरळीत करतांना त्रेधातिरपीट उडाली तर पुन्हा वादळाने वीजतारा तुटला व खांब वाकल्याने त्यांचे हाल सुरू आहे.

आंजी (मोठी) येथे विजेवरील उपकरणे निकामी
आंजी (मोठी) : शनिवारी रात्री विजेचा कडकडाट व वादळी वाºयासह पाऊस झाला. विजेच्या कडकडाटामुळे वॉर्ड क्रमांक दोनमधील दीपक वनवे यांच्याकडील कॅमेरा, डीव्हीआर, दूरचित्रवाणी संच, सेटटॉप बॉक्स आणि दिवे, शिव डोंगरे यांच्याकडील दूरचित्रवाणी संच निकामी झाले. तर निखिल मिसाळ यांच्याकडील लाईट व पंखे जळाले. यामुळे संबंधितांचे नुकसान झाले.

घोराडात वादळवारा, गारपीट
घोराड : सतत येत असलेले वादळी वारे पुन्हा एकदा शनिवारी मध्यरात्री धडकल्याने शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागले. शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. शनिवारी कृषी विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. हा अहवाल शासन दप्तरी तयार होणार, तोच शनिवारी रात्री ११.४५ ला वादळीवाºयाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटाने सर्वांची झोप उडविली. एक तासाहून अधिक काळ वादळाचे थैमान सुरू होते. दरम्यान अनेकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. शेतातील गोठ्यांची पडझड झाली. केळीच्या पानांची दुर्दशा झाली. आता काही जण केळी उपटून पºहाटी लावण्याचा मार्ग शोधत आहे. सतत झालेल्या वादळवाºयामुळे वीज वितरण कर्मचाºयांची तारांबळ उडत आहे. शेतातील कृषिपंप सुरू करायचे की, गावातील वीजपुरवठा सुरळीत करावा, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. वीज वितरण घोराड शाखेअंतर्गत सुकळी, कोटंबा, घोराड, मोही असा विस्तीर्ण परिसर आहे. वीज कर्मचाºयांची कमतरता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचणीची ठरत आहे. वाकलेले खांब व तुटलेल्या तारा जोडण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असल्याने शेतातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वादळी वाºयासह पावसाने गावखेड्यातील पाणीपुरवठा प्रभावित होत आहे.
 

Web Title: Storm hits Selu taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस