केळझर परिसरात वादळाने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:35+5:30
रस्ते बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मोक्रूावर पत्ता नसल्याने ग्रामस्थांचा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू होता. तर येथील मुस्लिम कब्रस्थानच्या नव्यानेच बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीवर अजस्त्र चिंचेचे झाड पडल्याने सुरक्षा भिंत क्षतिग्रस्त झाली तसेच सिमेंटचा वीजखांबाही धाराशाही झाला. त्यामुळे १५ ते २० शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

केळझर परिसरात वादळाने नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास वादळी पावसाने थैमान घातले. यात केळझर, खडकी परिसरातील शेतातील वीज खांब धाराशाही झालेत. दरम्यान, रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता. रविवारी दुपारी काही भागातील, पुरवठा सुरळीत करण्यात आला. शेतातील वीज अद्याप बंदच आहे. तर अनेक विशाल वृक्ष या वादळाने उन्मळून पडले. डेरेदार वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. रस्ते बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मोक्रूावर पत्ता नसल्याने ग्रामस्थांचा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू होता. तर येथील मुस्लिम कब्रस्थानच्या नव्यानेच बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीवर अजस्त्र चिंचेचे झाड पडल्याने सुरक्षा भिंत क्षतिग्रस्त झाली तसेच सिमेंटचा वीजखांबाही धाराशाही झाला. त्यामुळे १५ ते २० शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वादळी पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. काहींच्या घरावरील टिनपत्रेही उडाल्याने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा अंदाज घेण्याकरिता तलाठी व कृषी सहाय्यकांची मात्र, रविवारी उशीरापर्यंत हजेरी नव्हती.
सिंदीला पावसाचा दणका, विजेचा कडकडाट
सिंदी (रेल्वे) : शहरासह परिसरात रविवारी अचानकपणे विजेच्या कडकडाटासह अडीच ते तीन तास वादळीवाºयासह पाऊस झाल्याने अनेकांचे नुकसान झाले. दोन दिवसांपूर्वी वादळी वाºयासह मुसळधार पावसामुळे गोठ्यावरील टिनपत्रे उडून गेल्याने वैरण, कुटार, शेतमाल ओला झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. टिनपत्र्यांच्या मारामुळे जनावरांना इजा झाली. वीजतारा तुटल्याने काही भागातील वीजपुरवठाही बंद आहे. हे सर्व सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना रविवारी रात्री वादळी वाºयाचा फटका सिदी आणि परिसराला बसला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात ज्यांचे गोठे उडून गेले, त्या शेतकºयांनी दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, रविवारी झालेल्या वादळाने पुन्हा शेतकºयांसमोर अडचण निर्माण केली. सिंदी, पिपरा, दिग्रज, पळसगाव, गौळ, परसोडी शिवारातील ४० वीजखांब तसेच कांढळीवरून सिंदीला येणाºया मुख्य लाईनवरील १३ वीजखांब दोन दिवसांपूर्वीच्या वादळात जमीनदोस्त झाले. वीजतारा तुटल्याने सुरळीत करणे सुरू असताना पुन्हा रात्रीच्या वादळामुळे महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांची धावपळ होताना दिसून येत आहे. कर्मचाºयाना नवीन अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वादळात कांढळी रोड तसेच गौळ रोडवर शेतातील मोठी झाडे उमळून पडली आहेत.