धोतरा चौरस्ता : सोयाबीन व कापसाला अनुदानाची मागणीवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे निसर्गाच्या अवकृपेमुळे व बाजारपेठेच्या सुलतानी व्यवस्थापनामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र कृषक समाजाच्यावतीने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी वर्धा जिल्ह्यातील वर्धा-हिंगणघाट मार्गावर धोतरा चौरस्ता येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी आमदार वसंतराव कार्लेकर, बाबाराव झलके, जिजा राऊत, माजी जि.प. सदस्य, संजय काकडे, निमंत्रक महाराष्ट्र कृषक समाज, गजानन हायगुणे माजी सरपंच, प्रमोद पिंपळे, नरेश भोयर, विनोद पांडे, किशोर इंगळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.यावर्षी कापसाचे अत्यल्प पीक होऊनसुद्धा सरकारने गांभिर्याने लक्ष दिले नाही व कमी किमतीत कापूस खरेदी करण्यात आला. आता शेतकऱ्यांच्या घरातून कापूस निघाल्यानंतर बाजारभाव वाढला व शेतकरी नाडवल्या गेला. शासनाचे कर्तव्य म्हणून बाजारभावाचा फरक कापसाला बोनस म्हणून देण्यात यावा, अशी मागणी कार्लेकर यांनी यावेळी केली. भूमी अधिग्रहण सन २००१ पासून प्रस्तावित असलेले गोजी लघु पाटबंधारे प्रकल्प गोजी गेली १५ वर्षांपासून मंजूर असून आजपर्यंत कामाला सुरूवात झाली नाही. १५ वर्षे अगोदर असलेली प्रकल्पाची गरज लाभ क्षेत्र ९० टक्के सिंचित झाल्यामुळे संपुष्टात आली. आधीच अपूर्ण व अशक्त असलेलया पाण्याचा स्त्रोत व ४५७.५ एकर शेतकरी भूमिहिन होणार असल्यामुळै हा प्रकल्प रद्द करे ही काळाची गरज आहे. भूमिअधिग्रहण कायदा (१/०१/२०१४) कलम २४ अनुसार ५ वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या जमिनी नियमानुसार परत करता येतात. परिसरातील लोकभावना व गरज लक्षात घेता, शेतकऱ्यांच्या कागदोपत्री ताब्यात घेतलेल्यसा जमिनी सुपिक व सिंचित आहे. दरडोई जमिनीवर लोकसंख्येचा भार लक्षात घेता देशाची सुपिक व सिंचित जमिनी पाण्याखाली जाणे व्यवहार्य ठरणार नाही, याकडे निमंत्रक संजय काकडे यांनी लक्ष वेधले. सोयाबीन १५ हजार रुपये अनुदान द्यावेसोयाबीन एकरी उतारा एक युरीयासची बॅग झाली म्हणजेच ५० ते ७० किलो पिकले. त्याकरिता शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रूपये अनुदान देण्यात यावे.कापसाला एकरी २५ हजार रुपये अनुदान द्याबुरशी, करपा, पांढरी माशी व वातावरणाच्या लहरीपणामुळे कपाशीचे उत्पन्न निम्यापेक्षा कमी आले व रोगामुळे औषधावर खर्च खूप झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे सरकारने २५ हजार रुपये एकरी अनुदान द्यावे. शेतमालाला हमीभाव दरवर्षी महागाई निर्देशांक जोडून द्यावा. शेतीला आज ८ तास वीज पुरवठा होतो. सबस्टेशनची संख्या वाढून वीजपुरवठा १२ तास पर्यंत नेण्यात यावा. शेतीला वहिवाटीकरिता पांदण रस्ते राजस्व अभियानाद्वारे राबवून मोकळ्या कराव्या. शेतकरी व्याख्या - ७/१२ वर नाव असलेलाच शेतकरी ही व्याख्या विस्तारित करून कर्त्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळावा. या प्रश्नांची उत्तरे स्व. गोविंद आदिक यांनी सुत्ररूपाने मांडलेल्या ११ कलमी सनदेत आहे. सनद जशीच्या तशी लागू करावी. मागण्यांचे निवेदन वर्धा नायब तहसीलदार यांना दिले. आंदोलनात गोजी येथील महादेव वरघणे, विजय कोईचाडे, प्रभाकर झाडे, कमला बोरडे, इंदिरा वरघणे, येसंबा येथील नरेश भोयर, निखिलेश थुल, सोनेगाव स्टेशन येथील प्रमोद पिंपळे, अमोल दौड, जऊळगाव येथील पंढरी चौधरी, पंढरी पोहेकर, सुनिल मडावी, धोतरा येथील गजानन सोनुले, अमोल काळे, विजय काळे, राजु धाबर्डे, टि.सी. राऊत यांच्या परिसरातील गावकरी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
By admin | Updated: December 17, 2015 02:11 IST