संतप्त शेतकऱ्यांचा वर्धा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 16:18 IST2017-11-22T16:18:10+5:302017-11-22T16:18:39+5:30
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बुधवारी दुपारी वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट समुद्रपूर भागात संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

संतप्त शेतकऱ्यांचा वर्धा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन
वर्धा
आॅनलाईन लोकमत
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बुधवारी दुपारी वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट समुद्रपूर भागात संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी नेते अतुल वांदिले यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात शेतकऱ्यांनी समुद्रपूर येथे विद्याविकास महाविद्यालय ते झेंडा चौक मार्गावर चक्का जाम आंदोलन केले.
भारनियमन, ओलितासाठी रात्री शेतात जाणे व आपला जीव धोक्यात घालणे याबाबींसाठी कोण जबाबदार असा प्रश्न वांदिले यांनी यावेळी उपस्थित केला. भारनियमनाचा प्रश्न सोडवण्यासाठी अभियंता व तहसीलदारांनी आंदोलनस्थळी भेट द्यावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. यावेळी समुद्रपूर तालुका उपअभियंता व तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी जाऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले व पाच दिवसाच्या आत हे प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.