नळयोजनेतील बंधार्यात घोळ
By Admin | Updated: May 31, 2014 00:07 IST2014-05-31T00:07:01+5:302014-05-31T00:07:01+5:30
शासकीय योजनेनुसार बंधारा न बांधता त्यात घोळ करण्यात आल्याचा आरोप विरूळ (आकाजी) येथील माजी सरपंचांनी भूजल संरक्षण विभाग वर्धा येथे तक्रारीद्वारे केला आहे. याकडे लक्ष देत

नळयोजनेतील बंधार्यात घोळ
विरूळ (आकाजी) : शासकीय योजनेनुसार बंधारा न बांधता त्यात घोळ करण्यात आल्याचा आरोप विरूळ (आकाजी) येथील माजी सरपंचांनी भूजल संरक्षण विभाग वर्धा येथे तक्रारीद्वारे केला आहे. याकडे लक्ष देत कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.
येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५0 ला रूपये खर्च करून नवीन विहीर, टाकी, व पाईपलाईनचे काम सुरू आहे. डिसेंबर २0१३ ला या कामाची सुरूवात झाली. विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. या विहिरीला लागूनच नाल्यात याच योजनेंतर्गत पाण्याची पातळी वाढावी, या उद्देशाने बंधार्याची निर्मिती करण्यात आली. नियमानुसार या बंधार्याची खोली ६ मीटर असणे गरजेचे होते. परंतु संबंधित ठेकेदार ठाकरे याने ५ मीटर खोली करून यावर संरक्षण भिंत उभारली.
ही बाब माजी सरपंच बाबाराव मानकर यांच्या लक्षात येताच त्यांनी भूजल संरक्षण विभाग वर्धा कार्यालयात याबाबत तक्रार नोंदविली. या तक्रारीची दखल घेत या विभागाचे संबंधित अधिकारी महाजन व पाटील यांनी सदर बंधार्याला भेट देवून पाहणी केली. त्यांनाही या बंधार्याची खोली १ मीटर कमी दिसली. त्यांनीही सदर ठेकेदाराला १ मीटर खोली करण्याची सूचना दिली. परंतु सदर ठेकेदाराने अधिकार्यांनाही न जुमानता ५ मीटरच खोलीकरण करून बंधार्याची निर्मिती केली. त्यामुळे सदर बंधार्यात घोळ झाल्याचा आरोपही माजी सरपंच मानकर यांनी भूजल संरक्षण विभागाकडे केला आहे.
त्याचप्रकारे नवीन बंधार्यात आलेल्या विहिरीचे खोलीकरण कमीच असल्याचेही मानकर त्यांनी सांगितले. पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवर लावलेली मोटरची वायरिंग ही कमी दर्जाची वापरल्याने ही वायरिंग वारंवार जळत असल्याने गावातील पाणीपुरवठा बंद रहात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बांधकामात भ्रष्टाचार करीत असलेल्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मानकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.(वार्ताहर)