शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

भदाडी नदीपात्राच्या खोलीकरण कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 11:48 PM

कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन व लोकसहभाग असे संयुक्त विद्यमाने चिकणी जामणी येथे यशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत भदाडी नदी पात्राच्या सरळीकरण, रूंदीकरण व खोलीकरण कामाला प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्देयशोदा नदी खोरे प्रकल्पांतर्गत कामे प्रगतीपथावर : विहिरी तथा भूजल पाणी पातळी वाढून शेतीला लाभ

ऑनलाईन लोकमतचिकणी (जामणी) : कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन व लोकसहभाग असे संयुक्त विद्यमाने चिकणी जामणी येथे यशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत भदाडी नदी पात्राच्या सरळीकरण, रूंदीकरण व खोलीकरण कामाला प्रारंभ झाला आहे.एक किमी अंतराच्या या कामाचा शुभारंभ चिकणी येथील सरपंच ललीता डफरे, उपसरपंच निलीमा पंधरे, ग्रामविकास अधिकारी जंगम, जलस्त्रोत विकास कार्यक्रम अधिकारी विनोद पारिसे, नवनीत उपाध्याय, चंद्रशेखर मोहिजे, ग्रामसेवक रितेश लाटकर, अभय मून यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी पारिसे यांनी विविध योजना, संस्थेचे कार्य आणि यशोदा नदी खोरे प्रकल्पाच्या महत्त्वाबाबत माहिती विषद केली. भदाडी नदी खोलीकरणाचे काम कमलनयन बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन आणि लोकसहभाग अशा संयुक्त प्रयत्नातून केले जात आहे. नदीलगत असलेल्या शेतीचे तथा काठावरील घरांचे दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे मोठे नुसकान होत होते. नदी पात्राच्या खोलीकरण व रूंदीकरणामुळे हे नुकसान टाळता येणार आहे. शिवाय विहिररींची पाण्याची पातळी वाढणार आहे. भूजल पातळी वाढून सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पर्यायाने उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. शिवाय गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. पुरामुळे पडिक पडलेली जमीन वाहतीखाली येऊन उत्पन्न घेता येणार आहे. जमिनीची सुपिकता वाढणार असून पर्यायाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.भदाडी नदी पात्राच्या खोलीकरणाचे हे काम एक किमी अंतरात करण्यात येणार आहे. याचा ३१ शेतकऱ्यांना तथा १५१ एकर शेतीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. यापूर्वी चिकणी गावामध्ये एकूण ३ किमी लांबीचे काम करण्यात आले असून याद्वारे ९१ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. एकूण या कामामुळे ३८५ एकर शेतीला फायदा होणार आहे. लाभक्षेत्रात येणाऱ्या ३५ विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार आहे.सदर यशोदा नदी खोरे प्रकल्प हा जिल्ह्यातील चार तालुक्यांत राबविला जात आहे. यात आर्वी २ गावे, वर्धा ७५ गावे, देवळी ५५ गावे, हिंगणघाट ११ गावे अशा एकूण १४३ गावांमध्ये कामे प्रस्तावित असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमाला रवी माणिकपुरे, अतुल देशमुख, शेखबाबा देवतळे, नितीन भोयर, नितीन आखुड, अतुल डफरे, दिगांबर वाणी, कमलाकर अलोने, लखन कुंभरे, अंबादास मडकाम, मनोज उईके, रूपेश डायरे, प्रदीप भोयर, विजय डागरे, गजानन मडकाम, झोलबा डायरे, प्रशांत डफरे, राजू तोडाम, दिलीप इंगोले आदींनी सहकार्य केले.चार तालुक्यांतील १४३ गावांमध्ये कामे प्रस्तावितयशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १४३ गावांमध्ये कामे प्रस्तावित आहेत. यात आर्वी तालुक्यातील दोन, वर्धा ७५, देवळी ५५ व हिंगणघाट ११ अशी गावे समाविष्ट आहेत. सध्या चिकणी जामणी येथील कामे सुरू असून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या १२२ शेतकऱ्यांना व ३८५ एकर शेतीला फायदा मिळणार आहे.

टॅग्स :riverनदी