शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

सिंदीत नवीन अंगणवाड्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिंदी (रेल्वे) : शहरात केवळ प्रभाग क्र. १ व ७ मध्येच अंगणवाडी आहे. प्रभाग १ व ...

ठळक मुद्देपत्रकार संघाची मागणी : तडस यांनी दिले आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : शहरात केवळ प्रभाग क्र. १ व ७ मध्येच अंगणवाडी आहे. प्रभाग १ व ७ च्या व्यतिरिक्त इतर प्रभागातील महिला व शिशुंना लाभ मिळत नाही. बालकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या अनुषंगाने प्रभाग क्र. २, ३, ५, ६ व ८ मध्ये नवीन अंगणवाडी सुरू कराव्या, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने संघाचे सचिव अमोल सोनटक्के यांनी खासदार रामदास तडस यांना निवेदनाद्वारे केली.अंगणवाडी योजनेअंतर्गत शहरातील प्रभाग क्र. १ व ७ मधील पात्र गर्भवती महिला ते ३ वर्षांपर्यंतच्या शिशुला अंगणवाडीच्या माध्यमातून डाळ, तांदूळ व इतर कच्च्या धान्याचा नि:शुल्क पुरवठा होत आहे. मात्र, शहरातील प्रभाग क्र. २, ३, ५, ६ व ८ या प्रभागातील पात्र महिला व शिशुंना या प्रभागात अंगणवाडी नसल्याकारणाने होत असलेल्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यापासून वंचित राहावे लागते.त्यामुळे याची दखल घेत या प्रभागातदेखील नवीन अंगणवाडी सुरू करण्याबाबतचे निवेदन पत्रकार संघाच्या वतीने खासदार रामदास तडस यांना दिले. यावेळी त्यांनी तत्काळ बालविकास प्रकल्प अधिकारी यांना नवीन अंगणवाडी सुरू करण्याबाबत विचारणा केली असता नगरपालिकेअंतर्गत प्रस्ताव बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करावे. त्यानंतर प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले.खासदार तडस यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर केंद्राकडून नवीन अंगणवाड्यांना ताबडतोब मंजुरी मिळवून देण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे नगर परिषदने त्वरीत नविन अंगणवाडी प्रस्ताव सादर करून शहरातील सर्वच प्रभागातील पात्र महिला व शिशुंना लाभ मिळेल याकरिता प्रयत्न करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नगरपरिषद संबंधित विभागाकडे त्वरित प्रस्ताव सादर करतील अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस