कापूस, चण्याची शासकीय खरेदी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:00 AM2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:00:07+5:30

मागील वर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव मिळाल्यामुळे यावर्षी तालुक्यात कापसाचा पेरा वाढला. चार हजारांवर हेक्टरमध्ये कापूस, तूर व चणा लागवड करण्यात आली. शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केला जात असून यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी सीसीआय आणि नाफेडचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून केवळ कारंजा तालुक्यात केंद्र सुरू करण्यात आले नाही.

Start government procurement of cotton and chana | कापूस, चण्याची शासकीय खरेदी सुरू करा

कापूस, चण्याची शासकीय खरेदी सुरू करा

Next
ठळक मुद्देभूमिपुत्र संघर्ष वाहिनी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : कापूस आणि तूर, चन्याला हमीभाव मिळावा व सध्या होत असलेली आर्थिक लूट थांबवावी यासाठी शासनामार्फत सीसीआयकडून कापसाची तर नाफेडकडून चणा व तूर खरेदी, सुरू करावी, अशी मागणी कारंजा तालुका भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने केली आहे.
मागील वर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव मिळाल्यामुळे यावर्षी तालुक्यात कापसाचा पेरा वाढला. चार हजारांवर हेक्टरमध्ये कापूस, तूर व चणा लागवड करण्यात आली. शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केला जात असून यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे.
जिल्ह्यात इतर ठिकाणी सीसीआय आणि नाफेडचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून केवळ कारंजा तालुक्यात केंद्र सुरू करण्यात आले नाही.
तळेगावला सीसीआयतर्फे कापसाची शासकीय खरेदी सुरू झाली आहे. मात्र, तळेगावचे केंद्र ५० कि.मी. अंतरावर आहे. तालुक्यातील शेतकºयांना विक्रीस नेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. चणा व तूर खरेदीसाठी नाफेडचे केंद्र कारंजा व आष्टीसाठी शासनाने मंजूर केले आहे. जवळपास ६०० शेतकऱ्यांनी तूर व चणा विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे. मात्र, वर्धा जिल्हा शासकीय भांडाराच्या हेकेखोर धोरणामुळे अद्याप सुरू झाले नाही. आष्टी व कारंजा ही दोन्ही शासकीय खरेदी केंद्रे वर्धा शहरापासून ६० कि.मी. पेक्षा अधिक आहे, म्हणून खरेदी सुरू करण्यात आली नाही, असा तुघलकी युक्तिवाद करण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी कापसाची सीसीआयमार्फत व चणा आणि तुरीची नाफेडमार्फत शासकीय खरेदी सुरू करीत शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी कारंजा तालुका भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे विनोद वलगावकर, राजू पालीवाल, राजू जोरे, प्रशांत घोडमाडे यांनी केली आहे.

कोरोनाचा फटका कापसाचे भाव कोसळले
खुल्या बाजारात प्रतिक्विंटल १ हजार ते १२०० रुपयांनी कमी

तळेगाव (श्या.पंत.) : एक महिन्यापासून लॉकडाऊनमुळे बंद असलेली कापुस खरेदी सर्व आदेशाचे पालन करीत सीसीआयने निवड केलेल्या जिनिंग फॅक्टरीतील खरेदी केंद्रावर सुरू करण्यात आली आहे. कोरोनामुळे कापसाचे दर कोसळले आहे. सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर शासनाच्या हमीदरापेक्षा प्रतिक्विंटल १ हजार ते १२०० रुपयांनी कमी झाल्याने शेतकºयांना जबर आर्थिक फटका बसला आहे. लागवड खर्चही निघणे अवघड असल्याने वार्षिक आर्थिक नियोजन बिघडले
सीसीआयकडून कापसाला खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव दिला जात असल्याने शेतकºयांची पावले सीसीआयच्या खरेदी केंद्राकडे वळली आहेत. सीसीआयकडून खासगी व्यापाºयांपेक्षा जास्त दरात कापूस खरेदी केली जात असली तरी केंद्रावर शेतकºयांची गर्दी होऊ नये याकरीता प्रथम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी केल्यानंतर ज्या दिवशी ज्यांचा नंबर लागेल, त्याच दिवशी कापूस गाडी भरावी लागत असल्याने, आणि मोजक्याच गाड्या घेतल्या जात असल्याने खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या अडचणी वाढत आहेत. अनेक शेतकरी नाईलाजाने खासगी व्यापाºयांना ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपये इतक्या कमी भावात कापूस देत आहे.

Web Title: Start government procurement of cotton and chana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस