स्वच्छ वर्धा अभियान घरोघरी पोहोचवा
By Admin | Updated: January 27, 2015 23:37 IST2015-01-27T23:37:33+5:302015-01-27T23:37:33+5:30
स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून पवनार व वर्धा येथून ‘स्वच्छ वर्धा’ ही मोहीम सुरू करण्यात येत आहे. स्वच्छतेची मोहीम घरोघरी पोहोचविण्यासाठी नागरिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे,

स्वच्छ वर्धा अभियान घरोघरी पोहोचवा
एऩ नवीन सोना : प्रजासत्ताक दिनाचा शानदार सोहळा
वर्धा : स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून पवनार व वर्धा येथून ‘स्वच्छ वर्धा’ ही मोहीम सुरू करण्यात येत आहे. स्वच्छतेची मोहीम घरोघरी पोहोचविण्यासाठी नागरिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६५ व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा जिल्हा क्रीडा स्टेडिअम येथे आयोजित करण्यात आला़ जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ पोलीस दलाच्या संयुक्त पथसंचलनाची त्यांनी पाहणी केली. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा शालेय विद्यार्थ्यांद्वारे सादर कार्यक्रमांनी बहारदार ठरला. यावेळी पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, होमगार्ड समादेशक मोहन गुजरकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी सोना यांनी राष्ट्रध्वज वंदन करून परेडचे निरीक्षण केले. पोलीस विभाग एनसीसी, होमगार्ड, सैनिक शाळा व विविध शाळांतील विद्यार्थी असलेल्या पथसंचलनाची मानवंदना स्वीकारून झेंडा पथक, सशस्त्र पोलीस पथक तसेच विविध विकास योजना, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, दळणवळण आदी आकर्षक चित्ररथ लक्षवेधक ठरले़(कार्यालय प्रतिनिधी)