लोकमतच्या महारक्तदानाला तरुणांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 05:00 IST2021-07-03T05:00:00+5:302021-07-03T05:00:23+5:30
देवळी येथील खासदार रामदास तडस क्रीडा संकुलात आयोजित शिबिराचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सूचिता मडावी होत्या. वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकमतच्या महारक्तदानाला तरुणांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/देवळी/आर्वी : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान महायज्ञाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या अंतर्गत वर्धा, देवळी व आर्वी येथेही रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिराला रक्तदानासाठी तरुणांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
देवळी येथील खासदार रामदास तडस क्रीडा संकुलात आयोजित शिबिराचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सूचिता मडावी होत्या. वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या हस्ते करण्यात आले. तर आर्वी येथील एसएसबी हॉस्पिटल येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांच्या हस्ते करण्यात आले. तीनही ठिकाणी रक्तदान शिबिराला महिला-पुरुष, तरुण-तरुणी तसेच नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आज हिंगणघाट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
- लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमाअंतर्गत ३ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत साई सभागृह नंदोरी मार्ग, हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला हिंगणघाट व परिसरातील नागरिकांनी रक्तदानासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रविवार ४ जुलै रोजी सेलू येथे कुंभार सभागृह, शितलदास मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर होणार आहे.