‘स्पीडगन’ने रोखला ९८२ वाहनांचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:17+5:30

अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत असले तरी काही चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघाताच्या घटना घडतात. यावर प्रतिबंधासह दोषी वाहनचालकांवर कारवाई व्हावी, यासाठी ‘स्पीडगन’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मागील दोन महिन्यांपूर्वीच ‘स्पीडगन’ कार वाहतूक विभागात दाखल झाली आहे. भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या ९३४ वाहनधालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

'Speedgun' stopped at a speed of 19 vehicles | ‘स्पीडगन’ने रोखला ९८२ वाहनांचा वेग

‘स्पीडगन’ने रोखला ९८२ वाहनांचा वेग

ठळक मुद्देब्लॅक फिल्म, विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांच्याही आवळल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी पोलीस दलातील वाहतूक विभागात अत्याधुनिक ‘स्पीडगन’ वाहन दाखल झाले असून, या एका वाहनांमध्ये फिक्स टेबल अटॅच विथ स्पीड गन मशीन, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह मशीन आणि जीपीआरएस कनेक्टिव्हिटीची व्यवस्था देण्यात आली आहे. या अत्याधुनिक व्यवस्थेमुळे मागील दोन महिन्यांत ‘स्पीडगन’ वाहनाने तब्बल ९८२ वाहनांवर कारवाई करीत त्यांना ऑनलाईन नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहे.
अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत असले तरी काही चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघाताच्या घटना घडतात. यावर प्रतिबंधासह दोषी वाहनचालकांवर कारवाई व्हावी, यासाठी ‘स्पीडगन’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मागील दोन महिन्यांपूर्वीच ‘स्पीडगन’ कार वाहतूक विभागात दाखल झाली आहे. भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या ९३४ वाहनधालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या ४४ वाहनचालकांवर तर चारचाकीला ब्लॅकफ्लिम लागून असलेल्या ६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ महामार्गावर वापरण्यात येणारी हायस्पीडगन कार शहरातील वाहतूक पोलिसांना देण्यात आल्याने बेशिस्त वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. काही वाहनचालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालक वाहने चालवित असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. या घटना टाळण्यासाठी आणि वाहनचालकांमध्ये जागृती करण्यासाठी वाहतूक शाखेकडून प्रयत्न होताना दिसते. काही प्रमाणात का होईना पण; वाढते अपघात टाळण्यास ‘स्पीडगन’ ची मदत होणार आहे.

Web Title: 'Speedgun' stopped at a speed of 19 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस