वडसा-गडचिरोलीदरम्यानच्या रेल्वेलाईनच्या कामाला गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:24 IST2017-11-13T23:23:45+5:302017-11-13T23:24:12+5:30
वडसा ते गडचिरोली यादरम्यान मंजूर असलेल्या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी ....

वडसा-गडचिरोलीदरम्यानच्या रेल्वेलाईनच्या कामाला गती द्या
ठळक मुद्देरेल्वे कमिटी सदस्यांची मागणी : पटोलेंकडून आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वडसा ते गडचिरोली यादरम्यान मंजूर असलेल्या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी आणि नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण करून विकासकामांना मार्गी लावावे अशी मागणी देसाईगंज येथील माजी नगराध्यक्ष जेसाभाऊ मोटवानी, रेल्वे कमिटीचे सदस्य अॅड.संजय गुरू, आदिवासी नेते ईश्वर कुमरे व इतर नागरिकांनी खासदार नाना पटोले यांच्याकडे केली.
यासंदर्भात पाठपुरावा करून हे काम लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी खा.पटोले यांनी दिले.
दोन वर्षांपासून हे काम अद्याप सुरू झालेले नाही.